अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मना’चे श्लोक हा नवीन मराठी चित्रपट शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाच्या शीर्षकाचं समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकशी साधर्म्य असल्याने काही हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाला तीव्र विरोध केला आहे. पुण्यासह विविध ठिकाणी गोंधळ घालून शो बंद पाडले. या पार्श्वभूमीवर मृण्मयी देशपांडे हिने चित्रपटाचे प्रदर्शन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून गुरुवार, १६ ऑक्टोबरपासून नवीन नावासह पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.
















