पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना थेट लक्ष्य केलं आहे. या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांची भेट घेत समजही दिली होती. मात्र त्यानंतरही धंगेरकर यांचे आरोप सुरूच आहेत. रवींद्र धंगेकरांनी आज पत्रकार परिषद घेत याबद्दल पुन्हा भाष्य केलं आहे.