राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना पक्षातर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत काल पक्षाची बैठक पार पडली. यावेळी संग्राम जगतापही उपस्थित होते. यावेळी अजित पवार आणि संग्राम जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.