Dombivali MNS Raju Patil Raises Concern Over Stuck Ambulance Near Station Road: डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ फेरीवाल्यांच्या अतिक्रमाणामुळे एक रुग्णवाहिका स्थानक परिसरात अडकून होती. या रुग्णवाहिकेचे चित्रीकरण मनसेचे माजी आमदार राजु पाटील यांनी प्रसारित करुन संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधी “डॅाक्टर” असला म्हणून सर्व काही चांगले आहे व त्यांनाच सर्व कळते असे नाही. त्या लोकप्रतिनिधीला लोकांच्या ‘समस्यांची नाडी’ पण पकडता आली पाहिजे असे म्हणत त्यांनी थेट शिंदेंना डिवचल्याची चर्चा आहे. नगरविकास खात्यावर पण यांच्याच बापजाद्यांची जहागीरदारी आहे, मग आयुक्तांना आदेश द्यायला काय अडचण आहे? असाही सवाल त्यांनी उपस्थित करत टीकेची झोड उठविली.