Air India Flight Marathi Women Viral Video: मराठी भाषेचा मुद्दा मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरांत चिघळत असताना आता विमानातही मराठी बोलण्यावरून प्रवाशांमध्ये वादावादी झाल्याचे समोर आले आहे. माही खान नामक युट्यूबरने त्याच्या इन्स्टाग्रामवर २३ ऑक्टोबर रोजी एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात त्याचा आणि एका महिला सहप्रवाशाचा वाद झाल्याचं दिसून येत आहे. अशातच माही खानने शेअर केलेल्या व्हिडीओमधील महिलेने आता अविनाश जाधव यांची भेट घेतली आहे. “आता माही खानला धडा शिकवणार”, असं अविनाश जाधव म्हणाले.













