Yashomati Thakur: आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीचा ‘किराणा’ पाठवून राजकीय खोडी काढल्यामुळे राणा दाम्पत्य आणि ठाकूर यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच उफाळून आला आहे. रवी राणा यांच्या या कृतीने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी राणा दाम्पत्याला थेट ‘भैया-भाभीनं औकातीत राहायचं,’ असा इशारा दिला आहे.













