Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नागपूर कार्यालयाचे उद्घाटन अवघ्या दोन महिन्यापूर्वी अजित पवार यांच्याच हस्ते झाले होते. या कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनसंपर्कासह पक्ष वाढवण्याबाबतचे उपक्रम अपेक्षित आहे. परंतु या कार्यालयात चक्क दिवाळी मिलन कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांनी ठुमके लावत लावणी सादर केली. पक्ष कार्यालयात सादर केलेल्या या लावणीला तिथे उपस्थित असलेले शहर अध्यक्ष इतर पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात आणि जोरदार शिट्ट्या वाजवत दादही दिली. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.










