पुण्यात एक कथित जमीन व्यवहार घोटाळा समोर आला आहे. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागिदारी असलेल्या कंपनीचा सहभाग आहे. या प्रकरणामुळे विरोधकांनी अजित पवारांसह महायुती सरकारला धारेवर धरत सखोल चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे सरकारच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे विश्लेषण.


















