शिंदे गटातील बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख यांनी कुंडलिक खांडेंच्या हाती शिवबंधन बांधलं. ही लढाई केवळ शिवसेनेपुरता नाही. तर मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.



















