प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादव यांच्या सभेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद खरा होती की एआय तंत्रज्ञानाचा वापराने तयार केलेली माणसं होती? हे कळे ना झालं आहे, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्यांचं सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या असतात त्यांचं सरकार येतं हे लोकशाहीतील गणित कळण्यापलीकडे आहे.












