नवी मुंबईत धुळीने माखलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याचे विना परवानगी अनावरण करण्यावरून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत आमच्या पोराचा अभिमान आहे असं म्हटलंय. पुण्यातील जमीन व्यवहार व पक्ष चोरीच्या मुद्द्यावरूनही शर्मिला यांनी खडेबोल सुनावले आहेत.
















