Navi Mumbai MNS Leaders Beat Hindi Speaking Man Over allegations by Women: राज ठाकरेंच्या मनसैनिकांकडून नवी मुंबईतील वाशी येथे एका हिंदी भाषिक व्यक्तीला चांगलाच चोप दिल्याचं सांगणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एका महिलेशी या व्यक्तीने गैरवर्तन केले असून अश्लाघ्य भाषेत तिच्यावर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर कार्यालयात बोलावून हिंदी भाषिकाला मारहाण करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, मनसे सहकार सेनेचे बाळासाहेब शिंदे यांनी रमेश शुक्ला नावाच्या हिंदी भाषिकाला कार्यालयात बोलावून त्याला चोप दिलाय. इतकेच नाही तर तक्रारदार महिलेने सुद्धा शुक्लाच्या कानशिलात लगावली आहे. दरम्यान कार्यकर्त्यांनी दबाव टाकताच रमेश शुक्लाने माफी मागितली आहे.


















