Pravin Tarde: अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी लेखक विश्वास पाटील यांच्याबरोबर रायगडाला भेट दिली, तेव्हा त्यांनी गडाच्या भिंतीमधील भेगांमध्ये कचरा पहिला आणि याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रवीण तरडेंनी रायगडावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी रायगडावर कचरा टाकणाऱ्यांवर संताप व्यक्त केला.



















