Ladki Bahin Yojna 2025- महाराष्ट्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. महायुती सरकारकडून राज्यात लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. मात्र आता या संदर्भात एक नवीन अपडेट आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक होते. याची डेडलाइन 18 नोव्हेंबर 2025 देण्यात आली होती. मात्र आता महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.



















