चितेगाव औद्योगिक वसाहतीमधील औरंगाबाद अलॉइज या कंपनीत मंगळवारी सकाळी स्फोट झाला. यात एकजण ठार, तर चारजण जखमी झाले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सुदामसिंग रामब्रिजसिंग हा बिहारमधील खिल्ला येथील रहिवासी आहे. त्याचा स्फोटात मृत्यू झाला.
पैठण रोडवरील फारोळा शिवारात अलॉइज कंपनीत अॅल्युमिनियमच्या खिडक्यांचे उत्पादन केले जाते. ओव्हनमध्ये अॅल्युमिनियमच्या पाटय़ा मजबूत केल्या जातात. सकाळी साडेनऊच्या सुमारास गॅस सुरू असताना स्फोट झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला, तर युनूसखान गफूरखान पठाण, रहीमखान शेरखान पठाण, कृष्णकुमार व संतोष खोतकर हे चौघे कामगार जखमी झाले. स्फोटामागील कारण स्पष्ट झाले नाही. या बाबत पोलीस तपास करत आहेत. औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे अधिकारीही तपास करणार आहेत. भीषण स्फोटामुळे कंपनीच्या छतावरील पत्रे फाटले. अन्य साहित्याचेही नुकसान झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blast in alois company in aurangabad one died 4 injured