कमी पाण्यावर येणारे रब्बी हंगामातील पीक म्हणून हरभरा पेऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल असून, या पेऱ्यात यंदाच्या हंगामात लक्षणीय वाढ झाली, तर अधिक पाणी लागणाऱ्या गव्हाच्या पेऱ्यात ५० टक्के घट झाली.
जिल्हय़ात हरभऱ्याचा अपेक्षित पेरा ५० हजार ५०० हेक्टर होता. या वर्षी १ लाख ६ हजार ७६४ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला. हा पेरा सरासरीच्या २११ टक्के आहे. उस्मानाबादमध्ये ६१ हजार १०० अपेक्षित क्षेत्र होते. प्रत्यक्षात ६० हजार ५२२ हेक्टरवर म्हणजे ९९ टक्के पेरा झाला. नांदेडात ४६ हजार ३०० हेक्टर अपेक्षित क्षेत्राऐवजी ५३ हजार ८२० हेक्टर, म्हणजे ११६ टक्के पेरा झाला. परभणीत ४९ हजार १०० हेक्टर अपेक्षित क्षेत्राऐवजी ४६ हजार ९०० हेक्टर म्हणजे ९६ टक्के पेरा झाला, तर हिंगोली जिल्हय़ात ३२ हजार ९०० अपेक्षित क्षेत्राऐवजी ३४ हजार ७०० हेक्टरवर म्हणजे १०५ टक्के पेरा झाला. गव्हाच्या पेऱ्यात विभागात लक्षणीय घट झाली. विभागात १ लाख ७८ हजार ५०० गव्हाच्या पेऱ्याचे क्षेत्र होते. या वर्षी केवळ ५८ हजार ५९० हेक्टर म्हणजे ३३ टक्क्यांवरच पेरा झाला. लातूर जिल्हय़ात ३२ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षित होती. प्रत्यक्षात १३ हजार ७४८ म्हणजे ४३ टक्के, उस्मानाबाद जिल्हय़ात ३० हजार २०० हेक्टरऐवजी १३ हजार ४९७ म्हणजे ४५ टक्के, तर नांदेड जिल्हय़ात ३२ हजार ८०० पैकी १५ हजार ४४० म्हणजे ४७ टक्के पेरा झाला. परभणी जिल्हय़ात ४३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १० हजार ५०० म्हणजे २४ टक्के, तर हिंगोली जिल्हय़ात ३९ हजार ८०० हेक्टरपैकी फक्त ५ हजार ४०८ म्हणजे १४ टक्के क्षेत्रावरच पेरा झाला. करडीच्या क्षेत्रातही विभागात चांगलीच घट झाली. एक लाख ४० हजार ६०० हेक्टरऐवजी केवळ ६८ हजार ५०० हेक्टर म्हणजे ४९ टक्के क्षेत्रावरच करडीची पेरणी झाली.
परभणी जिल्हय़ात सर्वाधिक ५९, तर नांदेड जिल्हय़ात सर्वात कमी ३७ टक्के करडीचा पेरा आहे. रब्बी ज्वारी क्षेत्रातही घट होण्याची परंपरा टिकून आहे. ५ लाख १९ हजार ६०० हेक्टर अपेक्षित क्षेत्रापैकी ४ लाख ५९० हेक्टर क्षेत्रावर हा पेरा झाला. विभागात सरासरी ७७ टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली. परभणी जिल्हय़ात सर्वाधिक ८७ टक्के पेरा असून हिंगोली जिल्हय़ात सर्वात कमी ६४ टक्के पेरा झाला.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Habhara farming increase weat farming decrease