शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त शहरात हिंदुत्व मशाल यात्रा, प्रतिमापूजन, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना शहर कार्यकारिणीच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमात शिवसैनिक लक्षणीय संख्येने सहभागी झाले होते.    
ऐतिहासिक पन्हाळगड येथून सकाळी हिंदुत्व मशाल यात्रेला प्रारंभ झाला. तिचे शहरातील शिवाजी चौक येथे आगमन झाल्यानंतर सेनाप्रमुखांच्या नावाने जयघोष करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या कोल्हापूरसह अन्य ठिकाणी झालेल्या सभांच्या भाषणांची चित्रफीत दाखविण्यात आली.     
सायंकाळी मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आजच्या कार्यक्रमास वैशाली क्षीरसागर, पूजा भोर, माजी शहरप्रमुख शिवाजी जाधव, जयवंत हारूगले, दुर्गेश लिंग्रज, रमेश खाडे, राजू पाटील, तुकाराम साळोखे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक सहभागी झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindutva mashal yatra of balasaheb thakre birth anniversary