मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ‘नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृती पुरस्कारा’साठी दै. ‘लोकसत्ता’चे खास प्रतिनिधी संजय बापट यांची निवड करण्यात आली आहे.
उत्कृष्ट राजकीय बातम्यांबद्दल संजय बापट यांना ‘नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृती पुरस्कार’ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दै. ‘महाराष्ट्र टाईम्स’चे वार्ताहर नितीन चव्हाण यांना ‘कॉ. तु. कृ. सरमळकर स्मृती पुरस्कार’, साप्ताहिक ‘चित्रलेखा’चे स्तंभलेखक डॉ. जे. बी. शिंदे यांना ‘विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
तसेच ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये लिखित ‘पत्रकार दि. वि. गोखले : व्यक्तित्व व कर्तृत्व’ या पुस्तकाची ‘जयहिंद प्रकाशन पुरस्कारा’साठी निवड करण्यात आली आहे. पत्रकार दिनानिमित्त ६ जानेवारी रोजी पत्रकार भवन, आझाद मैदान येथे आयोजित करम्यात येणाऱ्या समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. समारंभास प्रमुख पाहुणे व महनीय वक्ते म्हणून साप्ताहिक ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाट उपस्थित राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalist union award to sanjay bapat