येथील कैलास कलानिकेतच्या आठ विद्यार्थ्यांच्या चित्रांची सोलापूर येथे होणाऱ्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी विविध रंग, रेषा, आकार, पोत, रचना या घटकांचा वापर करून उत्कृष्ट कलाकृती सादर केल्या होत्या. कला संचालनालय मुंबईतर्फे या आठ चित्रांची कला प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कला संचालनालयातर्फे कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे कला प्रदर्शन सोलापूर येथे ७ ते ९ जानेवारी २०१४ दरम्यान होणार आहे. मूलभूत अभ्यासक्रम विभागातून प्रमोद गंगावणे, दीपक कोकाटे, निसार शेख यांची निवड झाली आहे. कला शिक्षण विभागातून अनुराधा डोरले, अर्जुन पारेकर, गजानन शिर्के, सुधीर उमप, आकाश गायकवाड यांच्या चित्रांची निवड झाली आहे.  या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य प्रवीण मुखकर, प्रा. श्रीकांत पुरी, प्रा. युवराज घोंगडे, प्रा. श्रीकांत दहिवाळ आदींनी अभिनंदन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kailash kalaniketan 8 students drawing selection