जिल्ह्य़ातील वडसा ते कुरखेडा मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक नर बिबट ठार झाला.
जड वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबटय़ाला जोरदार धडक दिली. यात बिबटय़ाच्या डोक्याला गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वडसाचे उपवनसंरक्षक आशीर्वाद रेड्डी, सहाय्यक उपवनसंरक्षक वाघाये, वनपरिक्षेत्र अधिकारी गिरीधर सोनवणे यांनी वडसा पोलीस ठाण्याला घटनेबाबत माहिती दिली. हा बिबटय़ा अंदाजे ३ ते ४ वर्षांचा असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 10-03-2013 at 12:48 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panther killed by unknown vehicle hit