शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदितांसाठी घेण्यात आलेल्या वाड:मय स्पर्धेचा निकाल निवड समितीच्या वतीने आज जाहीर करण्यात आला. ९ डिसेंबरला नगरमध्ये या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
पुरस्कार विजेते याप्रमाणे- अण्णासाहेब देशमुख स्मृती पुरस्कार- विठ्ठल मोरे, नवनाथ शिंदे. नंदकुमार पवार स्मृती पुरस्कार- अशोक बांगर, रमेश रोहकले. दलितमित्र अप्पासाहेब धस स्मृती पुरस्कार- कमल दातीर, राजेंद्र उगले, पारूबाई काकडे स्मृती पुरस्कार-गणपत जाधव, अर्जुनराव सदाफुले. सरुबाई संसारे पुरस्कार सुहास मुळे यांना व नानीबाई कानडे पुरस्कार कुसुमताई जिवडे यांना मिळाला. परिषदेच्या १० व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ही वाड:मय स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. परिषदेचे पदाधिकारी सुनिल गोसावी व भगवान राऊत यांनी ही माहिती दिली. प्राचार्य चंद्रकांत भोसले, शर्मिला गोसावी, मधुसुदन मुळे, अजयकुमार पवार, मेधाताई काळे, बबन गिरी, राजेंद्र उदागे, भारत गाडेकर, राजेंद्र फंड यांच्या निवड समितीने या पुरस्कारांची निवड केली. त्यासाठी राज्यभरातून पुस्तके मागवण्यात आली होती.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shabdha gandha award announce