विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांचे अनुकरण न करता प्रत्येक क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड यांनी केले.
नाशिकरोड येथील जिजामाता जलतरण तलावात महापालिका आणि जलक्रीडा अकादमी यांच्या वतीने प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराच्या समारोपात उत्कृष्ट जलतरणपटूंना गौरविण्यात आले. त्यावेळी गायकवाड बोलत होते.  प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समितीे सभापती रमेश धोंगडे, नगरसेविका संगिता गायकवाड, शिवसेना उपमहानगर प्रमुख प्रताप मेहेरोलिया, पाणी पुरवठा अभियंता एस. टी. जाधव, कांता वराडे हे उपस्थित होते. प्रास्तविक व्यवस्थापक माया जगताप यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप मोरे यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student should not follow anyone