येथील लेडीज क्लबच्या वतीने यंदाही उद्यापासून (बुधवार) चार दिवस भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन केले आहे. लेडीज क्लबच्या मदानावर होणाऱ्या या महोत्सवास सिनेकलावंतांसह मान्यवर हजेरी लावणार आहेत. सायंकाळी ६ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल.
उद्घाटनानंतर ‘तुझं माझं जमेना’ फेम मनवा नाईक या तारकेच्या उपस्थितीत दांडियाची रास रंगणार आहे. गुरुवारी ‘दुनियादारी’फेम कलावंत ऊर्मिला कानिटकर महोत्सवात आपला कलाविष्कार सादर करील. ‘उभ्या महाराष्ट्राला वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या गाण्याच्या माध्यमातून भुरळ पाडणारी अभिनेत्री मानसी नाईक हिच्या उपस्थितीत शुक्रवारी महोत्सवाची रंगत वाढणार आहे. समारोप शनिवारी (दि. १२) होणार आहे.
महाराष्ट्रातील लोकपरंपरांचा आविष्कार सादर करणाऱ्या ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या लोकसाहित्य, लोकपरंपरावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा ३५ कलाकारांनी सादर केलेला कलाविष्कार महोत्सवाचे विशेष आकर्षण असेल. महोत्सवात सहभागी होऊन नागरिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन लेडीज क्लबच्या अध्यक्ष अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today start ladies clubs dandia