कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील दोघे जण गॅसची टाकी दुचाकीवर घेऊन वसमतला जात असता कवठा पाटी चौकात ऑटो व दुचाकीची टक्कर झाल्याने दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले.
हिवरा येथील मनमत चिंतामण धरमले (वय २५) व किशन ज्ञानोबा नागोरे (वय ३०) हे दोघे शनिवारी दुपारी १२.३० वाजता  दुचाकीवरून (एमएच२६-एफ९०४२) गॅस सिलिंडर घेऊन वसमतकडे जात असताना समोरून आलेल्या ऑटोरिक्षाची (एमएच२६-एडी५२८५) टक्कर झाली. यामध्ये दोन जण ठार झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two killed in two wheeler accident