एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन एआय-१७१ विमानाचा १२ जून रोजी अपघात होऊन २६० लोकांचा मृत्यू झाला. अपघाताला एक महिना पूर्ण होताच विमान अपघात तपास ब्युरोने (AAIB) तपास अहवाल जाहीर केला. एअर इंडियाने एक्सवर पोस्ट शेअर करत तपास सुरू असल्यामुळे अहवालावर सध्या प्रतिक्रिया देणार नसल्याचे म्हटले आहे.