अभिनेता अक्षय केळकरने मराठी भाषेबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्याने म्हटले की, महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी बोलणे अपेक्षित आहे. एका नेटकऱ्याने मराठी न येणाऱ्यांना कानशिलात वाजवण्याची कमेंट केली, त्यावर अक्षयने नम्रतेने उत्तर दिले की, “नहीं आती क्या करे? क्षमा करो, हमें नही आती हम सिख लेंगे.” अनेकांनी अक्षयच्या विचारांना समर्थन दिले.