संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांना काळं फासून, डोक्यावर काळी शाई टाकत धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.