अंकिता लोखंडे News

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने टेलिव्हिजनवर काम करुन आपल्या करियरची सुरुवात केली. अंकिताचा जन्म १९ डिसेंबर १९८४ रोजी मध्यप्रदेशमधील इंदूर शहरामध्ये एका मराठी कुटुंबामध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव शशिकांत लोखंडे आणि आईचे नाव वंदना फडणीस-लोखंडे असे आहे. वडिलांच्या नोकरीमुळे ते इंदूरला वास्तव्याला होते. अंकिताची आई इंदूरमधील एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या.


शालेय जीवनामध्ये अंकिता बॅडमिंटन चॅम्पियन होती. पण पुढे काही कारणास्तव तिला या खेळापासून दूर जावे लागले. २००५ मध्ये अंकिताने पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तिला अभिनयाची आवड होती. याच क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने तिने मुंबई गाठली. २००७ मध्ये ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज’ या कार्यक्रमामध्ये अंकिता सहभागी झाली. २००७ ते २००९ या काळात लोकप्रिय ठरलेल्या या कार्यक्रमामुळे अंकिता लोखंडेला एकता कपूरच्या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका करायची संधी मिळाली.


ही मालिका होती ‘पवित्रा रिश्ता’. या मालिकेमध्ये अंकिताने अर्चना देशमुखचे पात्र साकारले. २००९ ते २०१४ या सहा वर्षांमध्ये ही मालिका टीआरपीच्या स्पर्धेमध्ये नेहमी अव्वल ठरली. अंकितासाठी अर्चना हे पात्र तिची ओळख बनले.


Read More
vedanti bhosale will entry in Laughter Chefs Season 2 appear with Ankita lokhande
साताऱ्याची वेदांती भोसले आता ‘लाफ्टर शेफ्स २’ गाजवणार, अंकिता लोखंडेने शेअर केले फोटो; अमृता खानविलकर प्रतिक्रिया देत म्हणाली, “अगं बाई…”

साताऱ्याच्या वेदांती भोसलेचं हिंदी टेलिव्हिजनमध्ये पाऊल, पाहा अंकिता लोखंडेबरोबरचे सुंदर फोटो

ankita lokhande dance kanha so jara song in baby shower ceremony
Video: “कान्हा सो जा जरा…”, अंकिता लोखंडेचा वहिनीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात डान्स, पाहा व्हिडीओ

अंकिता लोखंडेचा ‘हा’ डान्स व्हिडीओ पाहून चाहत्याने विचारलं, “तू कधी आनंदाची बातमी देणार?”

actress ankita lokhande mother in law ranjana jain wishes her birthday in special note
“मला तुझी सासू असल्याचा खूप अभिमान…”, अंकिता लोखंडेला वाढदिवसानिमित्ताने सासूबाईकडून मिळालं खास गिफ्ट, म्हणाल्या…

Ankita Lokhande Birthday: अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या वाढदिवसानिमित्ताने सासूबाई काय म्हणाल्या? वाचा…

ankita lokhande nia sharma viral ganpati dance video
Video : अंकिता लोखंडेच्या घरी बाप्पा विराजमान, फुगडी घालत ‘अग्निपथ’मधील गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

अंकिताच्या घरातील गणपतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात अभिनेत्री घरातच गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

ankita lokhande express her feeling about sanjay leela bhansali actress share photo on social media
“तुमची निष्ठा, तुमचा दृष्टिकोन…”, अंकिता लोखंडेने संजय लीला भन्साळींसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली…

अंकिता लोखंडेच्या खास पोस्टमुळे संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण

Swatantra Veer Savarkar box office Collection Day 15
स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाने १५ व्या दिवशी कमावले ४६ लाख रुपये, एकूण कलेक्शन जाणून घ्या

Swatantra Veer Savarkar Total box office Collection: ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाने एकूण किती कमाई केली? जाणून घ्या