scorecardresearch

बीसीसीआय News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) ही भारतातील क्रिकेट खेळासाठीची राष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. या संघटनेद्वारे देशामध्ये क्रिकेट संबंधित सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवले जाते. १७५१ मध्ये भारतातील पहिला क्रिकेटचा सामना खेळला गेला असे म्हटले जाते. १७९२ मध्ये कोलकाला क्रिकेट क्लबची स्थापना झाली. हळूहळू भारतामध्ये क्रिकेट क्लब्सची स्थापना होत गेली. १९१२ मध्ये भारतीय संघाचा पहिला दौरा इंग्लंड येथे नेण्यात आला होता. पटयालाचे महाराज या संघाचे नेतृत्त्व करत होते. दरम्यानच्या भारतामध्ये क्रिकेट खेळाबाबत लोकांमध्ये कुतूहल निर्माण होत गेले. देशभरात या खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी देशातील विविध भागातून क्रिकेट क्लब्समधील प्रतिनिधी धडपड करु लागले. पटयाला, दिल्ली, बडोदा, पंजाब अशा वेगवेगळ्या प्रांतातील प्रतिनिधींद्वारे २१ नोव्हेंबर १९२७ मध्ये दिल्लीमध्ये एका बैठकीचे आयोजन केले गेले. या बैठकीमध्ये भारतामध्ये क्रिकेट बोर्डची स्थापना व्हावी यावर सर्वांचे बहुमत झाले. यातून पुढे डिसेंबर १९२८ मध्ये बीसीसीआय म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. १९३० मध्ये मद्रास सोसायटी अ‍ॅक्ट अंतर्गत बीसीसीआयची अधिकृत नोंदणी करण्यात आली. आर.ई. ग्रँट गोवन हे बीसीसीआयचे पहिले अध्यक्ष होते. सौरव गांगुलीनंतर रॉजर बिन्नी या संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड्सपैकी एक आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियमजवळ बीसीसीआयचे मुख्यालय आहे.Read More
Why Mohammad Shami not getting Chance in India Test Team Reason Revealed in Report
इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सने शमीला बरेच मेसेज केले पण…, रिपोर्टमध्ये मोठा खुलासा; संघात स्थान न मिळण्यामागचं कारण समोर?

Mohammad Shami: मोहम्मद शमीची दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कसोटी सामन्यासाठीही निवड झालेली नाही. त्याची निवड न होण्याबाबत चर्चा सुरू असतानाच शमीबाबत एक…

Twenty20 World Cup Cricket Tournament Wankhede Stadium to host semifinal opener and final in match Ahmedabad
2026 T20 World Cup: उपांत्य लढत मुंबईत? पुढील वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाची सलामीची लढत अहमदाबादला अपेक्षित

पुढील वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील एका उपांत्य लढतीच्या आयोजनाचा मान मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला मिळणे अपेक्षित आहे.

Asia Cup Trophy Controversy BCCI Secretary Devajit Saikia Gives Update on meeting With Mohsin naqvi
भारताला कधी मिळणार आशिया चषक ट्रॉफी? BCCI-PCB ची बैठक पार पडली; देवजीत सैकिया यांनी दिली अपडेट

आशिया चषक २०२५ च्या ट्रॉफीबाबत आयसीसीचा सभेत मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याची चर्चा होती. आता याबाबत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया…

The victory of the world champion women's cricket team is inspiring for the girls of the country
विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी

आयसीसी महिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघामधील राज्यातील खेळाडूंचा राज्य सरकारच्या वतीने सन्मान करण्यात आला.

narendra modi stadium Ahmedabad likely to host t20 world cup final 2026
T20 World Cup 2026 : ट्वेन्टी-२० विश्वचषकाचाही अंतिम सामना अहमदाबादमध्ये?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या स्पर्धेतील सामन्यांसाठी अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या पाच शहरांचा प्रस्ताव ठेवला आहे.

icc punishes suryakumar bumrah after india pakistan asia cup match controversies
सूर्यकुमार, बुमरावर शिस्तभंगाची कारवाई

‘आयसीसी’च्या एलिट सामना निरीक्षक समितीच्या सदस्यांसमोर भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान १४, २१ आणि २८ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यातील घटनांची चौकशी…

team india
Team India Victory Parade: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं सेलिब्रेशन केव्हा आणि कुठे होणार? BCCI सचिव म्हणाले…

BCCI On Team India Victory Celebration: भारताच्या विजयानंतर जंगी मिरवणूक काढली जाणार का? याबाबत बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे.

BCCI to Get Back Asia Cup
Women WC ट्रॉफी आली; आता लक्ष्य आशिया कपची ट्रॉफी; बीसीसीआयचे पदाधिकारी दुबईला रवाना

BCCI to Get Back Asia Cup : भारतीय संघाने जिंकलेला आशिया चषक भारतात आणण्यासाठी बीसीसीआयने तयारी सुरू केली आहे. यासाठी…

ताज्या बातम्या