देवेंद्र फडणवीस Videos

devendra fadnavis says sit to probe arson in beed during maratha quota stir

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ५ डिसेंबर २०२४ ला मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि वयाच्या ४४ व्या वर्षी ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. तसेच डहलम स्कूल ऑफ एज्युकेशनमधून बिझनेस मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते १९९८ मध्ये जर्मनीला गेले होते. २००६ मध्ये त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याशी लग्न केले आणि त्यांना

दिविजा नावाची एक मुलगी आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी आपली राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून (RSS) सुरू केली आणि १९९० च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये सामील झाले. त्यांनी नागपूरच्या राम नगर प्रभागातून त्यांची पहिली महापालिका निवडणूक जिंकली आणि १९९२ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९७ मध्ये, ते नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर आणि भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर बनले. १९९९ पासून ते २००४ पर्यंत सलग तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.


२०१९ साली त्यांनी ‘पुन्हा येईन’ अशी घोषणा देत भाजपाचे १०५ आमदार निवडून आणले. पण शिवसेनेने निकालानंतर युती तोडल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर त्यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण बहुमत सिद्ध करण्यात अडचणी दिसत असल्यामुळे तीनच दिवसात त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे २०२२ साली शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना बाजूला करून शिवसेनेवरच हक्क सांगितला. एकनाथ शिंदेंबरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन केले. तसेच २०२३ मध्ये राष्ट्रवादीतून अजित पवारांना वेगळे करण्यातही त्यांनी यश मिळविले. मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो, असे विधान त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान केले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे १३२ आमदार निवडून आणण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांनी साधली आहे. सलग तीनवेळा भाजपाचे १०० हून अधिक आमदार निवडून आणण्याचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस यांच्या नावे नोंदवला गेला आहे.


२०२४ च्या लोकसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. मात्र भाजपाला २०१९ मध्ये असलेल्या २३ जागा पुन्हा जिंकून आणण्यात अपयश आले. २८ जागा लढणाऱ्या भाजपाला केवळ ९ जागा मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदावरून मुक्त करण्याची विनंती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे केली. मात्र पक्षाने त्यांची मागणी फेटाळून लावत विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्यावरच विश्वास असल्याचे दाखवून दिले.


Read More
Mahayuti governments 100-day report card announced which ministrys department ranks at which rank
Mahayuti Government Report Card: कोणत्या मंत्र्यांचा विभाग कितव्या क्रमांकावर?

महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या सर्व विभागांसाठी एक १०० दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम हाती…

Sanjay Gaikwad made apologizes after controversial statement about police
Sanjay Gaikwad: पोलिसांबाबत वादग्रस्त विधानानंतर संजय गायकवाड यांची दिलगिरी

महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात नाही, असं वादग्रस्त विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं. त्यांच्या या विधानावर चौफेर…

Chief Minister Devendra Fadnavis criticizes Thackeray group
Devendra Fadnavis: “मुर्खासारखे विधान करणं…”; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे गटावर टीका

Devendra Fadnavis: गुरुवारी (२४ एप्रिल) दिल्लीत सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला पहलगामचा बदला घेण्यासाठी पूर्ण पाठिंबा…

Ajit Pawar announced the schedule of the Chief Minister and Deputy Chief Minister
Ajit Pawar: अजित पवारांनी सांगितलं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं वेळापत्रक

Ajit Pawar on Mahayuti Government : “राज्यात महायुतीचं सरकार २४ तास जनतेची कामं करत असतं”, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार…

CM Devendra Fadanvis and Eknath shinde gave a reaction after the terrorist attack in Pahalgam
Fadnavis And Shinde: पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा देखील समावेश आहे. या घटनेवर…

MLA Amit Gorkhen and Bhise family meet the Chief Minister over Dinanath Mangeshk Hospital case
Dinanath Mangeshk Hospital case : आमदार अमित गोरखेंसह भिसे कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीस सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांच्या मृत्यूला कुटुंबीयांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार…

Devendra Fadnavis first reaction to Raj Thackerays statement
Devendra Fadnavis: राज ठाकरेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Devendra Fadnavis: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळाव्यात जोरदार भाषण केलं. “तुमच्या…

ताज्या बातम्या