scorecardresearch

दसरा २०२५ Videos

‘दसरा’ किंवा ‘विजयदशमी’ (Dussehra) हा हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण सण आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. दसरा हा या शुभ मुहूर्तांपैकी एक आहे असे मानले जाते. यामुळे दसऱ्याच्या दिवशी कोणतेही काम करायला सुरुवात केली तर ते काम पूर्ण होते अशी अनेकांची आस्था आहे. यामुळे पूर्वीच्या काळी दसऱ्याच्या दिवशी राजे-महाराजे आपल्या सैन्यासह लढाई करण्यास निघत असत असेही म्हटले जाते. क्षत्रियांप्रमाणे व्यापारी मंडळीही याच दिवशी व्यापारासाठी बाहेर पडत, गावची सीमा ओलांडत असत. गावाची, नगराची सीमा ओलांडण्याच्या याच कृतीवर दसऱ्याशी निगडीत “सीमोल्लंघन करणे” ही म्हण प्रचलित झाली असा अंदाज लावला जातो. मुळात सीमोल्लंघन करणे म्हणजे जुन्या गोष्टी सोडून नव्या ध्येयासाठी पुढे जाणे होय.


दसऱ्याला (Dasara)काहीजण विजयदशमी असेही म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दैत्य महिषासुर आणि दुर्गा यांच्यामध्ये युद्ध सुरु होते. या युद्धाचा शेवट दसराच्या दिवशी झाला. अश्विन दशमीच्या दिवशी विजय मिळाल्यामुळेही या दिवसाला ‘विजयादशमी’ म्हणत असावेत असे असू शकते. दसऱ्याशी अन्य पौराणिक गोष्टीही संबंधित आहेत. भगवान श्रीराम यांनी राक्षसांचा राजा रावण यांचा वध दसऱ्याला केला होता. यामुळेच दसऱ्याला रावणवध देखील साजरा केला जातो. भारतात त्यातही उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये दसऱ्याला रावणाचे मोठ्ठाले पुतळे तयार करुन ते जाळले जातात. या पुतळ्यांसह आपल्या सर्वांच्या आत असलेली नकारात्मक शक्तीही नाहीशी होवो असा विचार दडलेला आहे असे म्हटले जाते.


दसऱ्याच्या दिवशी पांडव अज्ञातवासातून बाहेर पडले म्हणजेच त्यांनी सीमोल्लंघन केले. अज्ञातवासात जाण्यापूर्वी त्यांनी आपल्याला कोणी ओळखू नये यासाठी म्हणून आपापली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवली होती. दसऱ्याला सर्व पांडवांनी ती शस्त्रे बाहेर काढून त्या पाचही भावंडांनी शस्त्रांची पूजा केली. यामुळेच आपल्याकडे विजयादशमीच्या, दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरातील मौल्यवान वस्तूंची पूजा केली जाते. पूजा करताना सरस्वती मातेचे आवाहन देखील केले जाते. महाराष्ट्रामध्ये दसऱ्याला आपट्याची पाने एकमेकांना देत शुभेच्छा दिल्या जातात.


Read More
ramdas kadam statement on balasaheb thackeray deadbody eknath shinde shivsena melawa
Ramdas Kadam: रामदास कदमांचा गंभीर दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Ramdas Kadam: मुंबईतील (Mumbai) नेस्को सेंटर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यांच्या निमित्ताने एकमेकांवर राजकीय…

CM Eknath Shinde criticized Mahavikasaghadi over maharashtra politics
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मविआवर हल्लाबोल; म्हणाले, “मला हलक्यात घेऊ नका…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून मविआवर टीका केली आहे. “माझी दाढी त्यांना खुपतेय. अरे होती दाढी म्हणून तुमची…

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Dasara melava in Mumbai Shivaji Park LIVE
Uddhav Thackeray Live: शिवाजी पार्कवर दसरा मेळावा; उद्धव ठाकरे LIVE

शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यातील भाषणार उद्धव ठाकरे कोण-कोणत्या विषयावर भाष्य करणार…

CM Eknath Shinde Shivsena Dasara melava Live
Eknath Shinde Live: दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे LIVE | Dasara Melava

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेला दसरा मेळावा हा मुंबईमधील आझाद मैदान येथे पार पडत आहे. या मेळाव्यातील भाषणात एकनाथ…

MNS Chief Raj Thackeray appeal to voters on the occasion of Dasara
Raj Thackeray: “बेसावध राहून चालणार नाही…”; राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच निवडणुकीत मतदारांनी काय करणं आवश्यक आहे?…

Manoj Jarange Patil Live: नारायण गडावर दसरा मेळावा; मनोज जरांगे LIVE
Manoj Jarange Patil Live: नारायण गडावर दसरा मेळावा; मनोज जरांगे LIVE

बीडमधील नारायणगड येथे मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. नारायणगड येथे होणाऱ्या या मेळाव्यात जरांगे मराठा आंदोलनाची पुढील…

Manoj Jarange Patil dashhara melava 2024 Live from Narayangad
Manoj Jarange Patil Live: नारायण गडावर दसरा मेळावा; मनोज जरांगे LIVE

बीडमधील नारायणगड येथे मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. नारायणगड येथे होणाऱ्या या मेळाव्यात जरांगे मराठा आंदोलनाची पुढील…

BJP Leader Pankaja Gopinath Munde Dasara melava Live In Beed
Pankaja Munde Live: भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा; पंकजा मुंडे LIVE

पंकजा मुंडे यांनी बीडमधील भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे.या मेळाव्याला धनंजय मुंडे हे देखील हजेरी लावणार आहेत,…

ताज्या बातम्या