scorecardresearch

हेमा मालिनी News

हेमा मालिनी या अभिनेत्री तसेच राजकारणी आहेत. ‘ड्रीम गर्ल’ अशी ओळख असणाऱ्या हेमा मालिनी यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ रोजी झाला. १९६३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इधू साथियम’ या तमिळ चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेविश्वामध्ये प्रवेश केला. पुढे १९६८ मध्ये त्यांनी ‘सपनों का सौदागर’ या हिंदी चित्रपटापासून चित्रपटांमध्ये प्रमुख नायिका म्हणून काम करायला सुरुवात केली. ‘जॉनी मेरा नाम’, ‘सीता गीता’, ‘शोले’, ‘सत्ते पे सत्ते’, ‘क्रांती’ यांसारखे असंख्य चित्रपट केले आहेत. अभिनेते धर्मेंद यांच्या त्यांनी ‘तू हसीन मैं जवान’ या चित्रपटामध्ये पहिल्यांदा काम केले. एकत्र काम करताना ते दोघे प्रेमात पडले. १९८० साली त्यांनी लग्न केले. त्यांना ईशा आणि अहाना अशा दोन मुली आहेत. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी २८ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. अभिनयासह त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मितीचीही आवड आहे. हेमा यांनी लहानपणी भरतनाट्यमचे शिक्षण घेतले आहे.


अभिनय क्षेत्रात आपल्या ठसा उमटवल्यानंतर त्यांनी राजकारण प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी २००४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २००३ ते २००९ दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर २०१९ आणि २०२४ मध्येही त्यांनी मथुरा मतदारसंघातून निवडून आल्या. हेमा मालिनी या विद्यमान खासदार आहेत. त्यांना २००० साली भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.


Read More
Razia Sultan flopped after row over same sex kissing scene
दोन अभिनेत्रींच्या किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; प्रेक्षकांनी नाकारलेला कोट्यवधींचे बजेट असलेला चित्रपट फ्रीमियम स्टोरी

या फ्लॉप चित्रपटामुळे बॉलीवूडला बसलेला आर्थिक फटका, तर दिग्दर्शकाचा ठरला शेवटचा सिनेमा

Prakash kaur was looking suitable groom for stepdaughter Esha Deol
प्रकाश कौर सावत्र मुलीसाठी स्थळ शोधत होत्या; धर्मेंद्र यांनी स्वतः केलेला खुलासा, पण ईशा-भरतच्या लग्नात…

Dharmendra Personal Life : ईशा देओलला चौथीत असताना वडिलांच्या पहिल्या लग्नाबद्दल समजलेलं अन्…

Hema Malini
“ती फार मोठी घटना नव्हती”, भाजपा खासदार हेमा मालिनींचे महाकुंभातील चेंगराचेंगरीवर विधान; ३० जणांचा झाला होता मृत्यू

Hema Malini : मौनी अमावस्येच्या दिवशी दुसऱ्या शाही स्नानादरम्यान महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. ज्यामध्ये किमान ३० जणांचा मृत्यू झाला होता.

dharmendra refuse to work with hema malini
धर्मेंद्र यांनी ‘या’ कारणामुळे दिला होता हेमा मालिनी यांच्याबरोबर काम करण्यास नकार, खुद्द ड्रीम गर्लनेच केला खुलासा…

हेमा मालिनी यांनी ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात धर्मेंद्र यांनी त्यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता असे…

When Dharmendra answered if he converted to Islam to marry Hema Malini
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी दुसरं लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारण्याबाबत दिलेलं उत्तर, म्हणालेले “मी असा माणूस…”

Dharmendra Hema Malini Wedding Story: विवाहित धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी दुसरं लग्न करण्यासाठी स्वीकारला होता इस्लाम धर्म? त्यांनीच दिलेलं उत्तर

esha deol pune horrifying experience
“गर्दीतील एकाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श…”, ईशा देओलबरोबर पुण्यात घडलेला धक्कादायक प्रसंग; म्हणाली, “मी त्याला…”

Esha Deol Horrifying Experience: एका चित्रपटाच्या प्रिमियरवेळी पुण्यात घडलेला भयंकर प्रसंग ईशा देओलने सांगितला आहे.

hema malini video
फोटो काढायला आलेल्या चाहतीचा हात झटकून हेमा मालिनी म्हणाल्या असं काही की…; व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

Hema Malini Video: हेमा मालिनींचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी ‘त्या’ गोष्टीकडे वेधलं लक्ष