scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

जॉन अब्राहम Videos

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने मॉडेलिंगमधून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. २००३ साली त्याने ‘जिस्म’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर जॉन अब्राहमचे ‘पाप’, ‘साया’ हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले नाहीत. २००४ साली प्रदर्शित झालेल्या धूममुळे तो प्रसिद्धीझोतात आला. ‘सत्यमेव जयते’, ‘परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरन’, ‘बाटला हाऊस’, ‘मद्रास कॅफे’, ‘दोस्ताना’, ‘हाऊसफुल २’ या चित्रपटांमुळे तो जॉन चर्चेत होता. ‘पठाण’ या चित्रपटातही त्याने मुख्य भूमिका साकारली आहे. अभिनेत्री बिपाशा बासूबरोबरच्या रिलेशनशिपमुळे त्याने लक्ष वेधून घेतलं होतं.Read More