scorecardresearch

केएल राहुल News

Kl Rahul

कन्ननूर लोकेश राहुल (KL Rahul) हा भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज आहे. फलंदाजीसह तो क्षेत्ररक्षण देखील करतो. त्याचा जन्म १८ एप्रिल १९९२ रोजी कर्नाटकमधील बंगळुरु येथे झाला. त्याचे वडील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटकचे संचालक होते. त्यानंतर त्यांनी प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली. के.एल.राहुलची आईदेखील प्रोफेसर आहे. त्याला लहानपणापासून क्रिकेटबद्दल आकर्षण होते. हा वारसा त्याला वडिलांकडून मिळाला आहे.


के.एल.राहुलचे शिक्षण मंगळूरु येथे झाले. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. दोन वर्षांनंतर म्हणजे १२ व्या वर्षी त्याला बंगळुरु युनाईटेड क्रिकेट क्लब आणि मंगळुरुच्या क्लबमधून खेळायची संधी मिळाली. पुढे क्रिकेटमध्ये करिअर करायच्या उद्देशाने तो मंगळुरुहून बंगळुरुला राहायला गेला. दरम्यानच्या काळात त्याने जैन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला होता. के.एल.राहुल कर्नाटक संघाकडून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो. २०१०-११ मध्ये तो पहिल्यांदा स्पर्धांमध्ये खेळला होता. दरम्यान २०१० मध्ये त्याची अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये त्याने १४३ धावा केल्या.


पुढे २०१३ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हाच्या लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने (RCB)राहुलवर सर्वाधिक बोली लावली होती. २०१४ आणि २०१५ मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद या संघात होता. पुढे २०१६ मध्ये तो पुन्हा आरसीबीकडून खेळला. २०१८ मध्ये पंजाबने त्याला संघामध्ये घेतले. लगेचच २०१९ मध्ये त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले. २०१९ ते २०२१ या ३ वर्षांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी राहुलने सांभाळली. २०२२ च्या लिलावामध्ये लखनऊ या नव्या संघाने सर्वाधिक बोली लावत त्याला कर्णधारपद देऊ केले. तेव्हापासून तो लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार आहे. २०१४ मध्ये के.एल.राहुलने भारतीय कसोटी संघामध्ये पदार्पण केले. रोहित शर्माच्या जागी त्याला खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये पदार्पणात त्याला चांगला खेळ करण्यात अपयश मिळाले. पण पुढच्याच सामन्यामध्ये त्याने ११० धावा केल्या. २०१४ पासून त्याने ४७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये २,६४२ धावा केल्या आहेत. २०१६ च्या झिम्बाब्वे दौऱ्यावर राहुलची निवड करण्यात आली होती. याच दौऱ्यामध्ये त्याने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याने ५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,९८६ धावा केल्या आहेत. २०१६ मध्येच राहुलला आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. टी-२० फॉरमॅटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.


कन्ननूर लोकेश राहुल (के.एल.राहुल) हा भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज आहे. फलंदाजीसह तो क्षेत्ररक्षण देखील करतो. त्याचा जन्म १८ एप्रिल १९९२ रोजी कर्नाटकमधील बंगळुरु येथे झाला. त्याचे वडील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटकचे संचालक होते. त्यानंतर त्यांनी प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली. के.एल.राहुलची आईदेखील प्रोफेसर आहे. त्याला लहानपणापासून क्रिकेटबद्दल आकर्षण होते. हा वारसा त्याला वडिलांकडून मिळाला आहे. के.एल.राहुलचे शिक्षण मंगळूरु येथे झाले. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. दोन वर्षांनंतर म्हणजे १२ व्या वर्षी त्याला बंगळुरु युनाईटेड क्रिकेट क्लब आणि मंगळुरुच्या क्लबमधून खेळायची संधी मिळाली. पुढे क्रिकेटमध्ये करिअर करायच्या उद्देशाने तो मंगळुरुहून बंगळुरुला राहायला गेला. दरम्यानच्या काळात त्याने जैन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला होता.


के.एल.राहुल कर्नाटक संघाकडून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो. २०१०-११ मध्ये तो पहिल्यांदा स्पर्धांमध्ये खेळला होता. दरम्यान २०१० मध्ये त्याची अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये त्याने १४३ धावा केल्या. पुढे २०१३ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हाच्या लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने राहुलवर सर्वाधिक बोली लावली होती. २०१४ आणि २०१५ मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद या संघात होता. पुढे २०१६ मध्ये तो पुन्हा आरसीबीकडून खेळला. २०१८ मध्ये पंजाबने त्याला संघामध्ये घेतले. लगेचच २०१९ मध्ये त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले. २०१९ ते २०२१ या ३ वर्षांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी राहुलने सांभाळली. २०२२ च्या लिलावामध्ये लखनऊ या नव्या संघाने सर्वाधिक बोली लावत त्याला कर्णधारपद देऊ केले. तेव्हापासून तो लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार आहे.


२०१४ मध्ये के.एल.राहुलने भारतीय कसोटी संघामध्ये पदार्पण केले. रोहित शर्माच्या जागी त्याला खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये पदार्पणात त्याला चांगला खेळ करण्यात अपयश मिळाले. पण पुढच्याच सामन्यामध्ये त्याने ११० धावा केल्या. २०१४ पासून त्याने ४७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये २,६४२ धावा केल्या आहेत. २०१६ च्या झिम्बाब्वे दौऱ्यावर राहुलची निवड करण्यात आली होती. याच दौऱ्यामध्ये त्याने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याने ५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,९८६ धावा केल्या आहेत. २०१६ मध्येच राहुलला आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. टी-२० फॉरमॅटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. के.एल.राहुल त्याच्या एकूण कारकीर्दीमध्ये बऱ्याचवेळा दुखापतग्रस्त झाला आहे. याचा परिणाम त्याच्या खेळावरही झाल्याचे पाहायला मिळते. आयपीएल २०२३ मध्ये एका सामन्यादरम्यान त्याला पुन्हा इजा झाली होती. सध्या तो पूर्णपणे फीट झाला आहे अशी माहिती समोर आली आहे. आशिया कप २०२३ साठी त्याचा भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. परंतु स्पर्धेतील सुरुवातीचे दोन सामने तो खेळणार नसल्याचेही म्हटले जात आहे.



Read More
Karan Johar says he will never invite Virat Kohli on Koffee with Karan
विराट कोहलीला कधीच आपल्या शोमध्ये बोलवणार नाही, करण जोहरचं वक्तव्य; ६ वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंग सांगत म्हणाला…

Karan Johar says he will never invite Virat Kohli on Koffee with Karan : करण जोहरने विराट कोहलीला बोलवण्यास नकार…

Shreyas Iyer health update
Shreyas Iyer: श्रेयस अय्यर बाहेर झाल्यास कोण होणार उपकर्णधार? ‘हे’ आहेत ३ प्रबळ दावेदार

Shryeas Iyer Replacement: भारतीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. दरम्यान त्याच्या जागी उपकर्णधार म्हणून कोणाला संधी मिळू…

KL Rahul Complained About Kevin Pietersen to His Wife Said Tell him to go easy on him
“तुमच्या नवऱ्याला सांगा मला त्रास देऊ नकोस…”, केएल राहुलने ‘या’ खेळाडूची त्याच्या पत्नीकडे केलेली तक्रार, स्वत: सांगितली संपूर्ण घटना

KL Rahul Kevin Pietersan: केएल राहुल आणि केविन पीटरसन यांचे आयपीएलदरम्यानचे व्हीडिओ आपण पाहिलेत. आता राहुलने पीटरसनच्या पत्नीकडे त्याची तक्रार…

arshdeep singh
India vs Australia Live: भारताचा दुसऱ्या वनडे सामन्यातही पराभव, ऑस्ट्रेलियाने मालिका केली नावे

India vs Australia 2nd ODI: भारताचा सलग दुसऱ्या वनडे सामन्यात पराभव झाला असून ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका आपल्या नावे केली आहे,

IND beat WI by 7 Wickets India Whitewashed West Indies in Test Series
IND vs WI: भारताचा वेस्ट इंडिजवर ऐतिहासिक कसोटी मालिका विजय, टीम इंडियाने गंभीरला दिलं वाढदिवसाचं गिफ्ट

IND vs WI: सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकतर्फी विजय मिळवला आहे. यासह कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचा हा पहिला कसोटी…

yashasvi jaiswal record
IND vs WI: जैस्वालचा मोठा पराक्रम! WTC मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय

Yashasvi Jaiswal Record In WTC: भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

भारताचा वेस्टइंडिजवर विजय, टीम इंडिया,Team india
IND vs WI: अडीच दिवसात खेळ खल्लास! भारताचा वेस्टइंडिजवर १ डाव आणि १४० धावांनी मोठा विजय

India vs West Indies 1st Test Highlights: भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटीच भारतीय संघाने दमदार खेळ करत १…

KL Rahul Becomes First Player in Test Cricket 148 Year History to Get Out on exact 100 Runs Twice
IND vs WI: केएल राहुलचा दुर्मिळ विक्रम, १४८ वर्षांच्या कसोटी इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

KL Rahul Unique Record: केएल राहुलने वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटीत शतकी खेळी करत दुर्मिळ विक्रम आपल्या नावे केला आहे.

dhruv jurel, kl rahul, ravindra jadeja
IND vs WI 1st Test, Day 2: केएल राहुल- ध्रुव जुरेल- रवींद्र जडेजाची दमदार शतकं! दुसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला

India vs West Indies 1st Test, Day 2 Highlights: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये पहिल्या कसोटी सामन्याचा थरार अहमदाबादच्या…

ind vs wi
Ind vs WI: पळ, पळ, थांब…, साई सुदर्शन केएल राहुल यांच्यात झाला गोंधळ; दोघेही एकाच दिशेने धावले, video

Sai Sudarshan – Kl Rahul Misunderstanding: केएल राहुल आणि साई सुदर्शन हे दोघेही एकाच दिशेने धावले. साई सुदर्शनच्या चुकीमुळे केएल…

India A World Record With Highest Successful Run Chase of 412 Runs vs Aus A
भारताच्या ‘अ’ संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! राहुल-साईच्या शतकासह ऑस्ट्रेलिया अ संघावर मिळवला दणदणीत विजय; मालिकाही केली नावे

IND A vs AUS A: भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघाविरूद्धची कसोटी मालिका आपल्या नावे केली आहे. संघाने दुसऱ्या सामन्यात…

ताज्या बातम्या