scorecardresearch

केएल राहुल Photos

Kl Rahul

कन्ननूर लोकेश राहुल (KL Rahul) हा भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज आहे. फलंदाजीसह तो क्षेत्ररक्षण देखील करतो. त्याचा जन्म १८ एप्रिल १९९२ रोजी कर्नाटकमधील बंगळुरु येथे झाला. त्याचे वडील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटकचे संचालक होते. त्यानंतर त्यांनी प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली. के.एल.राहुलची आईदेखील प्रोफेसर आहे. त्याला लहानपणापासून क्रिकेटबद्दल आकर्षण होते. हा वारसा त्याला वडिलांकडून मिळाला आहे.


के.एल.राहुलचे शिक्षण मंगळूरु येथे झाले. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. दोन वर्षांनंतर म्हणजे १२ व्या वर्षी त्याला बंगळुरु युनाईटेड क्रिकेट क्लब आणि मंगळुरुच्या क्लबमधून खेळायची संधी मिळाली. पुढे क्रिकेटमध्ये करिअर करायच्या उद्देशाने तो मंगळुरुहून बंगळुरुला राहायला गेला. दरम्यानच्या काळात त्याने जैन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला होता. के.एल.राहुल कर्नाटक संघाकडून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो. २०१०-११ मध्ये तो पहिल्यांदा स्पर्धांमध्ये खेळला होता. दरम्यान २०१० मध्ये त्याची अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये त्याने १४३ धावा केल्या.


पुढे २०१३ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हाच्या लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने (RCB)राहुलवर सर्वाधिक बोली लावली होती. २०१४ आणि २०१५ मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद या संघात होता. पुढे २०१६ मध्ये तो पुन्हा आरसीबीकडून खेळला. २०१८ मध्ये पंजाबने त्याला संघामध्ये घेतले. लगेचच २०१९ मध्ये त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले. २०१९ ते २०२१ या ३ वर्षांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी राहुलने सांभाळली. २०२२ च्या लिलावामध्ये लखनऊ या नव्या संघाने सर्वाधिक बोली लावत त्याला कर्णधारपद देऊ केले. तेव्हापासून तो लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार आहे. २०१४ मध्ये के.एल.राहुलने भारतीय कसोटी संघामध्ये पदार्पण केले. रोहित शर्माच्या जागी त्याला खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये पदार्पणात त्याला चांगला खेळ करण्यात अपयश मिळाले. पण पुढच्याच सामन्यामध्ये त्याने ११० धावा केल्या. २०१४ पासून त्याने ४७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये २,६४२ धावा केल्या आहेत. २०१६ च्या झिम्बाब्वे दौऱ्यावर राहुलची निवड करण्यात आली होती. याच दौऱ्यामध्ये त्याने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याने ५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,९८६ धावा केल्या आहेत. २०१६ मध्येच राहुलला आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. टी-२० फॉरमॅटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.


कन्ननूर लोकेश राहुल (के.एल.राहुल) हा भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज आहे. फलंदाजीसह तो क्षेत्ररक्षण देखील करतो. त्याचा जन्म १८ एप्रिल १९९२ रोजी कर्नाटकमधील बंगळुरु येथे झाला. त्याचे वडील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कर्नाटकचे संचालक होते. त्यानंतर त्यांनी प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली. के.एल.राहुलची आईदेखील प्रोफेसर आहे. त्याला लहानपणापासून क्रिकेटबद्दल आकर्षण होते. हा वारसा त्याला वडिलांकडून मिळाला आहे. के.एल.राहुलचे शिक्षण मंगळूरु येथे झाले. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. दोन वर्षांनंतर म्हणजे १२ व्या वर्षी त्याला बंगळुरु युनाईटेड क्रिकेट क्लब आणि मंगळुरुच्या क्लबमधून खेळायची संधी मिळाली. पुढे क्रिकेटमध्ये करिअर करायच्या उद्देशाने तो मंगळुरुहून बंगळुरुला राहायला गेला. दरम्यानच्या काळात त्याने जैन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला होता.


के.एल.राहुल कर्नाटक संघाकडून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो. २०१०-११ मध्ये तो पहिल्यांदा स्पर्धांमध्ये खेळला होता. दरम्यान २०१० मध्ये त्याची अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकासाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये त्याने १४३ धावा केल्या. पुढे २०१३ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तेव्हाच्या लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने राहुलवर सर्वाधिक बोली लावली होती. २०१४ आणि २०१५ मध्ये तो सनरायझर्स हैदराबाद या संघात होता. पुढे २०१६ मध्ये तो पुन्हा आरसीबीकडून खेळला. २०१८ मध्ये पंजाबने त्याला संघामध्ये घेतले. लगेचच २०१९ मध्ये त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले. २०१९ ते २०२१ या ३ वर्षांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी राहुलने सांभाळली. २०२२ च्या लिलावामध्ये लखनऊ या नव्या संघाने सर्वाधिक बोली लावत त्याला कर्णधारपद देऊ केले. तेव्हापासून तो लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार आहे.


२०१४ मध्ये के.एल.राहुलने भारतीय कसोटी संघामध्ये पदार्पण केले. रोहित शर्माच्या जागी त्याला खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये पदार्पणात त्याला चांगला खेळ करण्यात अपयश मिळाले. पण पुढच्याच सामन्यामध्ये त्याने ११० धावा केल्या. २०१४ पासून त्याने ४७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये २,६४२ धावा केल्या आहेत. २०१६ च्या झिम्बाब्वे दौऱ्यावर राहुलची निवड करण्यात आली होती. याच दौऱ्यामध्ये त्याने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याने ५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,९८६ धावा केल्या आहेत. २०१६ मध्येच राहुलला आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. टी-२० फॉरमॅटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. के.एल.राहुल त्याच्या एकूण कारकीर्दीमध्ये बऱ्याचवेळा दुखापतग्रस्त झाला आहे. याचा परिणाम त्याच्या खेळावरही झाल्याचे पाहायला मिळते. आयपीएल २०२३ मध्ये एका सामन्यादरम्यान त्याला पुन्हा इजा झाली होती. सध्या तो पूर्णपणे फीट झाला आहे अशी माहिती समोर आली आहे. आशिया कप २०२३ साठी त्याचा भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. परंतु स्पर्धेतील सुरुवातीचे दोन सामने तो खेळणार नसल्याचेही म्हटले जात आहे.



Read More
India vs England Scorecard, IND vs ENG Highlights
9 Photos
IND vs ENG: मँचेस्टरमधला पहिला दिवस ठरला ऐतिहासिक; जयस्वाल, पंत व केएल राहुलने केले ‘हे’ विक्रम

IND vs ENG 4th Test: भारत विरुद्ध इंग्लंड मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने ४ विकेट गमावून २६४ धावा केल्या. केएल…

KL Rahul, KL Rahul
7 Photos
लॉर्ड्सवर केएल राहुलचा खास विक्रम; दिलीप वेंगसरकरांनंतर ‘असा’ पराक्रम करणारा दुसरा भारतीय खेळाडू

KL Rahul century: शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत शतक झळकावून केएल राहुलने एक विशेष कामगिरी केली. राहुलने १७७ चेंडूत १३ चौकारांसह…

Indian cricketer kl Rahul Net worth
9 Photos
KL Rahul Net Worth: आलिशान घर ते महागड्या गाड्या; लीड्सच्या मैदानावर शतक झळकावणारा केएल राहुल किती संपत्तीचा मालक?

KL Rahul Net Worth: केएल राहुलला महागड्या गाड्या खूप आवडतात. तो त्याच्या लक्झरी लाईफमुळेही चर्चेत राहतो. चला जाणून घेऊया केएल…

kl rahul, athiya shetty
9 Photos
क्रिकेटपटू केएल राहुल आणि अथिया शेट्टी होणार आई-बाबा, दोघांनीही चाहत्यांबरोबर शेअर केली गोड बातमी

KL Rahul-Athiya Shetty : केएल राहुल आणि अथिया शेट्टीने इन्स्टाग्रामवर आनंदाची बातमी शेअर केली आहे.

5 Players Who Are Going To Be Released Can Get More Than 20 Crores In Ipl Auction
9 Photos
IPL Retention 2025 : ‘हे’ ५ खेळाडू होणार रिलीज, नव्या ऑक्शनमध्ये मिळू शकतात २० कोटींहून अधिक

IPL Retention 2025 : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर पैशांच्या कारणामुळे वेगळा होणार आहे. अय्यरने मागितलेलं मानधन देण्यास केकेआरने…

Top 5 Fastest Century in T20I For India
6 Photos
Photo: भारतासाठी टी-२०मध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारे टॉप-५ फलंदाज, रोहित शर्मा पहिला तर…

Top 5 Indian Batter Who Hit Fastest T20I Century: भारत वि झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या टी-२० मालिकेत भारताचा तरूण फलंदाज अभिषेक…

Away Test Hundreds for Indian Wicketkeepers
9 Photos
PHOTOS : केएल राहुलसह ‘या’ सहा यष्टीरक्षक-फलंदाजांनी भारतासाठी कसोटीत झळकावली आहेत शतकं

Indian Wicketkeepers Hundreds : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात केएल राहुलने शतक झळकावून संघाचा डाव सावरला.…

Sachin Tendulkar's double century to K.L. Until Rahul's controversial statement, let's take a look at the 10 best moments from the India vs South Africa series
12 Photos
Photos: सचिन तेंडुलकरचे द्विशतक ते के.एल. राहुल बाबतच्या वादग्रस्त विधानापर्यंत: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतील टॉप १० क्षण

India vs South Africa series: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मालिका सुरु होत आहेत. या दोन्ही देशांच्या मालिकेत आतापर्यंत अनेक…

Cricketers getting married in 2023 Updates in marathi
9 Photos
PHOTOS : यंदा नवदीप सैनीपासून ते केएल राहुलपर्यंत ‘या’ क्रिकेटपटूंनी बांधली लग्नगाठ, जाणून घ्या कोण-कोण आहेत?

Cricketers getting married in 2023 : नुकतेच भारतीय क्रिकेटपटू नवदीप सैनीचे लग्न झाले. नवदीपपूर्वी अनेक क्रिकेटपटूंनी यावर्षी लग्न केले. आपण…

Pakistan bowed down in front of India all Team India including Babar-Rizwan flopped Not 1-2 India made 10 amazing records
15 Photos
IND vs PAK: टीम इंडियाने पाकिस्तानला दाखवले अस्मान! एक-दोन नाही तब्बल ‘एवढे’ विक्रम करत भारताने रचला इतिहास

IND vs PAK Super-4 Updates: आशिया चषक २०२३च्या सुपर-४ फेरीत भारताने पाकिस्तानवर २२८ धावांनी शानदार विजय मिळवला. कोहली-राहुल आणि कुलदीप…

ताज्या बातम्या