scorecardresearch

ममता बॅनर्जी News

mamata banarjee
ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री असून त्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या प्रमुख आहेत. याआधी त्यांनी सलग दोन वेळा म्हणजेच दहा वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद भूषवलेले आहे. २०११ सालापासून पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या पक्षाची एकहाती सत्ता आहे.

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी १९९८ साली तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना केली होती. त्यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी पदं भूषवेलेली असून त्या देशाच्या रेल्वेमंत्री राहिलेल्या आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला १९७० साली सुरुवात झाली. १९७६ ते १९८० या काळात त्या पश्चिम बंगाल महिला काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या. १९८४ साली त्या पहिल्यांदा खासदार झाल्या. त्यांतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

१९८४ साली त्यांच्याकडे भारतीय युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. १९९१-१९९६ या काळात पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सराकारमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास, युवक कल्याण आणि क्रीडा, महिला व बालविकास या विभागाच्या राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. काँग्रेस पक्षाशी वैचारिक मतभेद निर्माण झाल्यानंतर त्यांनी १९९९ साली राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमध्ये रेल्वेमंत्रिपद भूषवले.
Read More
West Bengal Chief Minister Mamata Banerjee
Mamata Banerjee: महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालमध्येही पेटला मातृभाषेचा मुद्दा; ममता बॅनर्जी म्हणाल्या, “तुम्ही बंगाली…”

Mamata Banerjee On Bengali: ममता बॅनर्जी यांनी भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिक लोकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला.

तृणमूल काँग्रेस विरूद्ध भाजपा, राज्यातील स्थलांतरितांवरून दोन पक्षांमध्ये जुंपली

बुधवारी ममता बॅनर्जी स्थलांतरित कामगारांच्या अपमानाविरोधात कोलकाता इथे एका रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. तृणमूल काँग्रेसचा असा विश्वास आहे की, ही…

Kolkata Rape Case
कोलकाता : प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्याचा महिलेवर बॉइज हॉस्टेलमध्ये बलात्कार

कोलकाता येथील एका प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्याने बॉइज हॉस्टेलमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

आरजी कार नंतर आता लॉ कॉलेज अत्याचार प्रकरण, विरोधी पक्षामुळे ममता सरकारची कोंडी

West Bengal Law college Rape case: ऑगस्ट २०२४ मध्ये आरजी कार इथे झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात…

mamata banerjee
अन्वयार्थ : न्याय मिळणार असेल तर…

पश्चिम बंगालमधून महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे सातत्याने पुढे येत आहेत आणि दरवेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधित व्यक्तीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी…

Kolkata Law Student Rape Case
Law Student Case : आरजी करच्या घटनेनंतर कोलकाता पुन्हा हादरलं; लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, तृणमूलच्या नेत्यासह दोघांना अटक

कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या आरोपानंतर या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे.

Mamata Banerjee election success
बंगालमध्ये ममतांना रोखणे भाजपसाठी आव्हानात्मक? पोटनिवडणुकीचे सारे कौल विरोधात!

राज्यात ममता समर्थक आणि विरोधक अशी सरळसोट मतविभागणी आहे. याखेरीज भाजप हिंदुत्वाच्या आधारे वातावरण निर्मिती करेल. यात दोन्ही बाजूने ध्रुवीकरण…

emand for forming State Mens Commission like Women
महिलांप्रमाणे राज्य पुरुष आयोगाची स्थापना? भाजपाच्या महिला आमदाराची विधानसभेत मागणी

West Bengal Assembly Monsoon Session : विधीमंडळाच्या सभागृहात घोषणाबाजी करून गोंधळ घालणाऱ्या भाजपाच्या चार आमदारांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे.

भाजपाला जिंकवण्यासाठी आरएसएस पुन्हा मैदानात? पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय? (छायाचित्र पीटीआय)
पश्चिम बंगालमध्येही महाराष्ट्र पॅटर्न? विधानसभा निवडणुकीसाठी आरएसएसची रणनीती काय? प्रीमियम स्टोरी

West Bengal Hindu Votes RSS Strategy : हिंदूंनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या मतांमध्ये फूट पडू द्यायची नाही, असं आवाहन संघाचे सरचिटणीस…

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आता कुठे आहेत? तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जींचा मोदी सरकारला सवाल

Abhishek Banerjee five questions: अभिषेक जेडीयूचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा भाग होते आणि २१ मे रोजी त्यांनी…

“रक्ताने माखलेले रस्ते”… फोटो, व्हिडीओ शेअर करत भाजपाचे तृणमूल काँग्रेसवर आरोप; सत्य नेमकं काय?

दरम्यान, मार्चमध्ये कोलकातामध्ये झालेल्या ईदच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना धार्मिक दंगलींना प्रोत्साहन देणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन…

Sharmishta Panoli latest news in marathi
अग्रलेख : खंडन ते खांडोळी!

एके काळी याच देशात हिंदू धर्माची, मनुस्मृतीची आणि त्यामुळे हिंदुत्ववाद्यांचीही कडक चिकित्सा झाली आणि याच देशात नरहर कुरुंदकर, हमीद दलवाई…

ताज्या बातम्या