scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

मणिपूर News

मणिपूर (Manipur) हे भारताच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. ईशान्येकडच्या सात राज्यांपैकी मणिपूर हे महत्त्वपूर्ण राज्य आहे. या राज्याच्या उत्तरेस नागालॅंड, दक्षिण भागाला मिझोराम, पश्चिमेस आसाम ही राज्ये आहेत. मणिपूरची पूर्वेची सीमा ही म्यानमार देशाला संलग्न आहे. इंफाळ हे मणिपूरमधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मणिपूरची राजधानीदेखील आहे. या राज्याचे क्षेत्रफण २२.३२७ चौ.किमी इतके आहे. तेथे मणिपुरी ही प्रमुख भाषा असली तरी तेथे अन्य भाषाही बोलल्या जातात. त्यामध्ये काही आदिवासी भाषांचा सुद्धा समावेश आहे. ब्रिटीश काळात मणिपूर हे एक संस्थान होते. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्यलढा सुरु असताना या भागात देखील स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते.


१९३० च्या उत्तरार्धामध्ये राज्यातील नागरिकांनी भारतीय संघराज्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली. पुढे १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विलीनीकरणावर वाटाघाटी झाली आणि त्यानंतर सप्टेंबर १९४७ मध्ये मणिपूर संस्थानाचे संस्थान भारतामध्ये सामील करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. मणिपूर हे नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेले आहे. मणिपूरच्या एकूण लोकसंख्येतील ४१ टक्के लोकसंख्या ही आदिवासी पाड्यामध्ये असल्याचे पाहायला मिळते. त्यात मणिपुरी लोक ५३ टक्के, विविध नागा जमाती २४ टक्केआणि कुकी-झो जमाली १६ टक्के आहेत. अनेक आदिवासी जमाती एकाच ठिकाणी जवळ-जवळ राहत असल्याने फार पूर्वीपासून या जमातींमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातही तेथे कुकी आणि मतैई या दोन समुदायांमध्ये अनेक कारणांवरुन वाद आहे.


हा वाद मागील काही महिन्यांपासून फार वाढला असल्याचे चित्र दिसते. जुलै २०२३ मध्ये कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. या भयानक प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्याने मणिपूरमधील स्थितीचे गांभीर्य सर्वांना कळाले. या दोन समुदायातील संघर्षामुळे खूप काळापासून मणिपूरमध्ये असंतोष आहे. या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तेथील राज्य सरकारसह केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.


Read More
delhi court acquitted Six accused in Delhi riots
संक्षिप्त : दिल्ली दंगलीतील सहा आरोपी निर्दोष; न्यायालयाचे पोलिसांना खडे बोल

अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी सहा आरोपींची सुटका करण्याचा आदेश दिला. २५ फेब्रुवारी २०२० रोजी दिल्लीत उसळलेल्या दंगलीवेळी हे…

adaso kapesa first woman assigned to pm modi's security team
अदासो कपेसा… पंतप्रधान नरेंद्र मोदींची संरक्षक

केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) अदासो कपेसा एक अधिकारी असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षणासाठी नियुक्त केलेल्या विशेष संरक्षण…

Supreme Court debates limits on judicial role in Governor and President assent to state bills BJP ruled states argue
अन्वयार्थ : मणिपूरमधील अपयश

स्वपक्षाचे सरकार, त्यातही जवळपास दोनतृतीयांश बहुमत असतानाही मणिपूरमध्ये लागू असलेल्या राष्ट्रपती राजवटीला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची वेळ केंद्रातील सत्ताधारी…

मणिपूरमध्ये सुरू आहे एसआयआरची तयारी, राजकीय पक्षांच्या बैठकी आणि प्रशिक्षणाची सुरूवात

मणिपूरमधील मेइतेई समुदाय आणि डोंगराळ भागातील अनुसूचित जमातीतील कुकी-झो समुदाय यांच्यामधील संघर्षामुळे निर्माण झालेल्या संकटाला तोंड देत असतानाच मणिपूरमध्ये एसआयआरसाठी…

Manipur conflict, RSS peace efforts, Meitei Kuki violence, Manipur tribal clashes, RSS role in Manipur,
अन्वयार्थ : संघाची ‘शांतता’! प्रीमियम स्टोरी

‘मैतेई आणि कुकी या दोन समुदायांमधील संघर्षामुळे गेल्या दोन वर्षांपासून धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये शांतता निर्माण व्हावी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रयत्न…

Air India Flight Manipur Cabin Crew Member
Air India Cabin Crew: विमान अपघातात दोघींचा मृत्यू आणि मणिपूरमधील वांशिक संघर्षाला मिळाला विराम; कुकी-मैतेई यांच्यातील वैर कसं निवळलं? फ्रीमियम स्टोरी

Air India Flight Manipur Cabin Crew Member: कुकी समुदायातून येणाऱ्या लॅमनुंथिम सिंगसन आणि मैतेई समुदायाच्या नगांथोई शर्मा कोंगब्रैलाटपम या दोन्ही…

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसक आंदोलने; अशांततेला नेमकं जबाबदार कोण? (फोटो सौजन्य पीटीआय)
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसक आंदोलने; अशांततेला नेमकं जबाबदार कोण?

Manipur Violence News : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसक आंदोलने सुरू झाली असून राज्याला अशांत करण्याचा कोण प्रयत्न करतंय? असा प्रश्न उपस्थित…