scorecardresearch

मेगा ब्लॉक News

मुंबईची जीवनदायनी अशी ओळख असलेल्या लोकल ट्रेनचे मध्य, पश्चिम आणि हार्बर असे एकूण ३ प्रमुख प्रकार पाहायला मिळतात. याशिवाय ठाणे ते वाशी या ट्रेनच्या मार्गाला ट्रान्स हार्बर असे म्हटले जाते. सकाळी ४ ते ४.३० च्या सुमारास लोकल ट्रेनचा प्रवास सुरु होतो. ट्रेनच्या असंख्य फेऱ्या या रात्री १२.३० ते १ च्या दरम्यान थांबतात. तेव्हा रात्री १ ते सकाळी ४ या सुमारास ट्रेनचा प्रवास बंद असतो. या काळात रेल्वेची दुरुस्तीची कामे सुरु असतात. त्यात रुळाची देखभाल, सिग्नल तसेच अन्य तांत्रिक गोष्टींमध्ये बदल केले जातात. पण या कामांसाठी हा वेळ पुरेसा पडत नाही. त्यामुळे रविवारच्या दिवशी मेगा ब्लॉक लावून ही कामे चार ते पाच तासांमध्ये करण्याचा प्रयत्न रेल्वे कर्मचारी, अधिकारी करत असतात. त्यामुळे मेगा ब्लॉक हा लोकलसाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण असतो.


मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर कोणत्या दिवशी किती तासांसाठी मेगा ब्लॉक होणार हे फार आधीपासून ठरवले जाते. एका रविवारच्या मेगा ब्लॉकसाठीची तयारी एक आठवडा आधीपासून केली जाते. गँगमन, कीमन, पॉइंट्समन हे कर्मचारी लोकलचे रुळ, सिग्नलचे पॉइंट्स, ओव्हरहेड वायर अशा असंख्य तांत्रिक गोष्टी तपासून घेतात. त्यात दोष आढळल्यास त्यांची नोंद करतात. या नोंदी विद्युत, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन आणि अभियांत्रिकी या भागांकडे पाठवल्या जातात. पुढे यातील प्रमुख विभागाकडून परिचालन विभागाला मेगा ब्लॉक घेण्यासाठीचे पत्र पाठवले जाते. हे पत्र तपासल्यावर परिचालन विभाग ब्लॉकची वेळ, गाड्यांचे वेळापत्रक वगैरे पाहून मेगा ब्लॉकचे वेळापत्रक ठरवतात. त्यानंतर हे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. शिवाय प्रवाशांनीही मेगा ब्लॉकची माहिती दिली जाते.


मेगा ब्लॉक (Mega Block) हे लोकसत्ता डॉट कॉमचे एक महत्त्वपूर्ण पेज आहे. या पेजवर मेगा ब्लॉक या विषयाविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच वाचकांनी नव्या अपडेट्ससह येथे वाचायला मिळतील.


Read More
dhammachakra Pravartan din draws lakhs to deekshabhoomi special trains planned by central railway
Mega Block: मुंबई – पुणे रेल्वे प्रवास खोळंबणार; प्रगती, डेक्कन क्वीन, इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द, कर्जत लोकल…

Mega Block Update: ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.२० ते १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.२० पर्यंत ब्लाॅक असेल. हा ब्लाॅक पळसधरी…

local railway mega block
Mega Block: कुर्ला – वाशी प्रवास रखडणार; रविवारी हार्बर, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लाॅक

Mega Block Update : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी हार्बर मार्ग आणि पश्चिम…

Karjat, Neral to Khopoli local services cancelled; Central Railway's block series
Central Railway Mega Block: कर्जत, नेरळ ते खोपोली लोकल सेवा रद्द; मध्य रेल्वेची ब्लाॅक मालिका

ओव्हर हेड वायरची कामे, पोर्टल उभारणी, तोडणे, अँकर शिफ्टिंग, लोड ट्रान्सफर आणि नवीन क्रॉसिंग पॉइंट्ससाठी ब्लाॅकची मालिका निश्चित करण्यात आली…

central railway mega block anant chaturthi karjat khopoli railway
ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवशी ब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल

प्रवाशांना कर्जतपर्यंत प्रवास करता येईल. तर, खोपोली – सीएसएमटी लोकल प्रवास रद्द राहणार आहे. मध्य रेल्वे प्रशासन सणासुदीच्या दिवशी ब्लाॅक…

maratha protesters to buy return train tickets for Rs 10
Manoj Jarange Patil Azad Maidan : मराठा आंदोलकांना प्रशासनाचा मोठा दिलासा; मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांची धावपळ कमी होणार

रविवारी मेगाब्लाॅक घेतला असता तर वाशी एक्झिबिशेन सेंटर वा इतर ठिकाणाहून आझाद मैदानावर येणार्‍या मराठा आंदोलकांची मोठी गैरसोय झाली असती.

mumbai local mega block
मध्य रेल्वे मेगाब्लाॅक : आज कोणत्या स्थानकांवर गाड्यांना थांबा नाही?

मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील विद्याविहार, कांजूर मार्ग, नाहूर या रेल्वे स्थानकाचा थांबा रद्द करण्यात आला आहे. धीम्या मार्गावरील फलाट…

vashi station night block to affect panvel local trains work to halt harbour line services
रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; माटुंगा-मुलुंड आणि कुर्ला-वाशी दरम्यान सेवा प्रभावित

मध्य रेल्वे मुंबई विभागात रविवार, ३ ऑगस्ट २०२५ रोजी महत्त्वाचे अभियांत्रिकी आणि देखभाल कामे हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी मेगा…

five hour mega block on Vashi Panvel harbour line on Sunday July 27
वाशी–पनवेल दरम्यान रविवारी पाच तासांचा मेगाब्लॉक; सीएसएमटी–वाशीदरम्यान विशेष लोकलची सुविधा

हार्बर मार्गावरील वाशी–पनवेल स्थानकांदरम्यान येत्या रविवारी, २७ जुलै रोजी सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ०४.०५ वाजेपर्यंत पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार…