scorecardresearch

पावसाळी अधिवेशन Photos

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Vidhansabha) हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाद्वारे राज्याचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, राज्यातील विविध प्रश्नांवर, गंभीर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच शासनाद्वारे केलेल्या कामांवर चर्चा करण्यासाठी, राज्यहितासाठी आवश्यक असलेली नवीन धोरणे राबवण्यासाठी अशा विविध गोष्टींसाठी विधानसभेद्वारे वर्षामध्ये तीन वेळा अधिवेशनाचे नियोजन केले जाते.


उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा ३ ऋतुंच्या वर्गीकरणाप्रमाणे उन्हाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन असे प्रकार पडतात. त्यातील उन्हाळी आणि पावसाळी अधिवेशन हे राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात पार पाडले जाते. तर हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आयोजित केले जाते. यावर्षी १७ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर अजित पवारांनीही बंडाची भूमिका घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आधी विरोधी पक्ष नेते ही जबाबदारी सांभाळणारे अजित पवार सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असल्याने आता विरोध पक्ष नेता कोण असा प्रश्न विरोधी पक्ष गटातील नेत्यांना पडला. अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये विरोधी पक्ष नेत्याशिवाय कामकाज सुरु होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या विजय वड्डेटीवार यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी देण्यात आली.


विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा सोडल्यास अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील प्रचारांनी गाजले. या व्यतिरिक्त जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ, सहकारी संस्थांमध्ये सदस्याच्या सक्रिय सहभागाची सुनिश्चिती करण्यासाठी प्रोत्साहन देणे, नियोजन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे विकास योजनेचा मसुदा सादर करण्याच्या कालावधीत वाढ, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठ सुधारणा विधेयक, महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा विधेयक, मुंबई महापालिका सुधारणा, एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, ललित कला शिक्षण मंडळ विधेयक अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा देखील झाली. हे अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपले.


Read More
manikrao kokate net worth
10 Photos
Manikrao Kokate Net Worth: थेट विधानसभेत रमी; व्हिडिओत दिसणारे माणिकराव कोकाटे कोट्यधीश; वाचा मालमत्तेची माहिती

Manikrao Kokate Net Worth: पावसाळी अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहातील बाकावर बसून ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्यामुळे प्रचंड चर्चेत…

Chaddi baniyan gang maharashtra Assembly
9 Photos
बनियन, टॉवेल गुंडाळून आमदार आले विधानभवनात; चड्डी बनियन गँगच्या नावानं घोषणाबाजी

Vidhan Bhavan Chaddi Baniyan Gang: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्रमक पवित्र घेत बनियन, टॉवेल गुंडाळून सरकारविरोधात आंदोलन…

Shiv Sena MLA Dispute In Vidhan Sabha Shambhuraj Desai Angry
9 Photos
Shambhuraj Desai Angry : “आमची लाज काढू नका”, मंत्री शंभूराज देसाई भडकले; ठाकरे-शिंदेंच्या नेत्यांमध्ये खडाजंगी, काय घडलं?

Shiv Sena MLA Dispute In Vidhan Sabha : ठाकरे आणि शिंदेंच्या नेत्यांमध्ये सभागृहात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.

Chandrashekhar Bawankule says Tukebandi Kayda cancels
9 Photos
आता १ गुंठा जमिनीचीसुद्धा खरेदी-विक्री करता येणार! तुकडेबंदी कायदा रद्द होणार, शेतकरी या कायद्याचा विरोध का करत होते?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “येत्या १५ दिवसांत आम्ही एसओपी करू. सभागृहातील सर्व सदस्यांना माझी विनंती आहे की या एसओपीमध्ये तुम्हाला वाटतील…

prithviraj chavan eknath shinde
6 Photos
“…तेव्हा खुट्टा अधिक बळकट होतो”, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना एकनाथ शिंदेंचं सडेतोड प्रत्युत्तर

“महाराष्ट्राच्या मतदारांशी, शिवसैनिकांशी आणि आपल्या परिवाराशीही गद्दारी आणि बेईमानी केली. मग ते…”, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

ambadas danve
6 Photos
PHOTOS : “मला कोणत्या नंबरवरून फोन आला, हे सांगायला भाग पाडू नका,” दानवेंचा राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांना इशारा

“भाजपाच्या आमदारांना २० कोटी, शिंदे गटाच्या आमदारांना ४० कोटी अन्…”, असेही अंबादास दानवे यांनी म्हटलं.

Tips for Umbrella Maintenance during monsoon
16 Photos
छत्री खरेदी करताना, वापरताना ‘या’ १० गोष्टींची काळजी घेतल्यास संपूर्ण पावसाळा एका छत्रीवर निघू शकतो

अनेकदा एक पावसाळा एका छत्रीत निघूच शकत नाही असं म्हटलं जातं. मात्र योग्य पद्धतीने छत्रीची काळजी घेतल्यास आरामात एक संपूर्ण…

ताज्या बातम्या