Page 3 of नाशिक जिल्हा News

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

नाशिकमध्ये दिवसाआड घडलेल्या दोन अपहरण आणि मारहाणीच्या घटनांचे गूढ उघडकीस आले असून, पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

मालेगावात माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली कथित ‘मत चोरी’ विरोधात भर पावसात मोठा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

नवरात्रोत्सव आणि सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते नांदेड विशेष रेल्वेगाड्या सुरू होणार असून, नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पितृपक्षातील धार्मिक विधींना आणि स्वच्छता कामांना अडथळा निर्माण झाला आहे.

नाशिक येथील मविप्र संस्थेच्या सभेत विद्यापीठाच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि एका व्यक्तीने कमरेला बंदूक लावून दहशत निर्माण केल्याने पोलिसांत तक्रार…

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील पंचवटी आणि भद्रकाली परिसरातील ११ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

अनाथ मुलांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे कौतुक करत शरद पवार म्हणाले, आम्ही तुमच्या सोबत आहोत.

जिल्हा परिषदेच्या ‘सुपर ५०’ योजनेतील सहा विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा आणि इतर संशोधन संस्था पाहण्याची अनोखी संधी मिळाली आहे.

टँकरमध्ये गुप्त पाईपद्वारे होणारी इंधन चोरी ही पेट्रोल पंपांची मोठी डोकेदुखी बनली असून, डिलर्सनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

शाळकरी मुलाच्या हत्येमुळे पाडळदे गावात संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची मागणी केली जात आहे.

चोरट्यांनी पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करत वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावली.