नवज्योतसिंग सिद्धू Videos

Navjot Siddhu
नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu)_हे माजी क्रिकेटपटू (Cricketer) आहेत. सध्या ते राजकाणात सक्रिय असून त्यांनी पंजाबचे पर्यटन आणि सांस्कृतिक व्यवहारमंत्री म्हणून काम केलेले आहे.

सिद्धू २००४ च्या लोकसभा निवडणुकीत अमृतसर (Amritsar) या मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र त्यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी २००६ साली आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. एप्रिल २०१६ साली भाजपाने त्यांना राज्यसभेत पाठवले. मात्र लगेच १८ जुलै २०१६ रोजी त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पुढे सप्टेंबर २०१६ साली त्यांनी भाजपा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.

जानेवारी २०१७ साली ते काँग्रेसमध्ये (Congress) सामील झाले. ते २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत अमृतसर (Amritsar) मतदारसंघातून निवडून आले होते. पुढे २०२१ साली त्यांची पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. मात्र २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
Read More
Congress leader Navjot Singh Sidhu shared an old video paying tribute to former Prime Minister Dr Manmohan Singh
Navjot Singh Sidhu : “वही लोग रहेते है खामोश अक्सर…”; नवज्योत सिंग सिद्धू यांचा व्हिडीओ चर्चेत

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहताना एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.…