scorecardresearch

शरद पवार Videos

sharad pawar

शरद पवार हे भारतातील प्रमुख राजकारण्यांपैकी एक आहेत. शरद पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुण्यातील बारामती तालुक्यात झाला. ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारण करणारे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. काँग्रेसपासून वेगळे होऊन त्यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना केली. मात्र २०२३ साली झालेल्या पक्षातील फुटीनंतर आता त्यांच्या पक्षाचे नाव “राष्ट्रवादी कांग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष”, असे आहे. तर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याकडे आहे.


शरद पवारांनी १९६० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९६७ मध्ये ते पहिल्यांदा बारामतीमधून विधानसभेवर निवडून आले आणि १९७८ मध्ये महाराष्ट्राचे सर्वात कमी वयातील मुख्यमंत्री झाले. त्यांनी तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. १९८४ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. केंद्रातही त्यांनी संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशी महत्त्वाची खाती सांभाळून त्यावर आपली छाप सोडली. राजकारणाबरोबरच शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.


आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, अंडरवर्ल्ड संबंध याशिवाय अनेक वाद झाले. तरीही चाणाक्ष पुढाऱ्याप्रमाणे त्यांनी विविध पक्षांसह युती करुन आपले राजकीय अस्तित्व आजही अबाधित ठेवले आहे. २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांना एकत्र आणत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. शरद पवारांच्या या खेळीमुळे १०६ आमदार असलेल्या भाजपाला अडीच वर्ष सत्तेपासून दूर राहावे लागले.


२०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घेतला. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधिमंडळात अजित पवार हा दावा टिकवण्यात यशस्वी झाले. पक्ष फुटीनंतरही शरद पवार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज देत १० उमेदवारांपैकी ८ उमेदवार जिंकून आणण्यात यश मिळवले. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाला एकच खासदार निवडून आणता आला. या निवडणुकीत शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका झाली. ते नेतृत्व सोडत नसल्याचा आरोप अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या नेत्यांनी केला. तरीही हे हल्ले पचवून शरद पवारांनी आपल्या पक्षाला यश मिळवून दिले.


Read More
Sharad Pawar And Ajit Pawar together At Technology Demonstration Project of the Krishi Vigyan Kendra Inauguration
Sharad Pawar And Ajit Pawar: बारामतीमधून शरद पवार आणि अजित पवार Live

Sharad Pawar And Ajit Pawar: बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या टेक्नॉलॉजी डेमोस्टेशन प्रोजेक्टच्या उद्घाटन सोहळ्याला शरद पवार आणि अजित पवार यांनी…

Will Thackeray brothers come together Sharad Pawar gave a reaction
Sharad Pawar: ठाकरे बंधू एकत्र येणार? शरद पवार म्हणाले,”मी काय ज्योतिष नाही…”

Sharad Pawar: ठाकरे बंधू एकत्र येणार का? असा प्रश्न प्रश्न शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर…

Pawar family come together Sunetra Pawar gave a clarification on journalist questioned
Sunetra Pawar: पवार कुटुंब एकत्र येणार? सुनेत्रा पवार म्हणाल्या…

Sunetra Pawar: बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल…

Speaking at a press conference Sharad Pawar praised a young woman from Malegaon
Sharad Pawar: पत्रकार परिषदेत शरद पवारांनी माळेगावच्या तरुणीला बोलवलं; म्हणाले…

Sharad Pawar: आज शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी माळेगावच्या एका…

Will Sharad Pawar and Ajit Pawar both come together ajit pawar gave a reaction on journalist questioned
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले…

Ajit Pawar: जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार…

Ajit Pawar avoided sitting next to Sharad Pawar
Pune: अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं; पुण्यातील कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

Sharad Pawar And Ajit Pawar: पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे ‘एआय’ बाबतच्या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले.या चर्चा…

Will sharad pawar and ajit pawar come together supriya Sule gave a reaction
Supriya Sule: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? पत्रकारांनी प्रश्न विचारताच सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Supriya Sule: शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे युतीची चर्चा जोर धरत असताना आता राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचीही चर्चा…

What did Sanjay Raut say about Ajit Pawar and Sharad Pawar coming together
Sanjay Raut: अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार? संजय राऊत म्हणाले…

Sanjay Raut: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पुन्हा एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहे. अशातच आता या चर्चांवर…

What did Sanjay Raut say about Chief Minister Devendra Fadnavis praising Sharad Pawar
Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस यांनी केलं शरद पवारांचे कौतुक; संजय राऊत म्हणाले…

Sanjay Raut: ‘इंडियन एक्सप्रेस ग्रुप’च्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. “शरद…

What did Sharad Pawar say about donald trumps mediation in the India Pakistan dispute
Sharad Pawar on Donald Trump: भारत-पाकिस्तानच्या वादात ट्रम्प यांची मध्यस्थी, शरद पवार म्हणाले…

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्त्री करून दोन्ही देशांत शस्त्रविराम जाहीर केला. त्यावरून…

ताज्या बातम्या