scorecardresearch

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) News

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची (Shivsena Udhhav Thackeray) स्थापना २०२३ साली झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचे चिरंजीव तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या गटाचे प्रमुख आहेत. २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली होती. विधान परिषद निवडणुकीची मतमोजनी सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी १६ आमदारांसह सुरत गाठले. शिवसेना पक्षाशी बंडखोरी करत शिंदे यांनी बहुसंख्य शिवसेना आमदारांसह भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. राज्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट उदयास आले.


एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावरदेखील दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.


शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीत सहभागी होत विरोधकाची भूमिका बजावत आहे. असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. तर महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने २१ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ९ जागा त्यांनी जिंकल्या. तर एकनाथ शिंदे यांना १५ जागा मिळाल्या होत्या त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले.


निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ४ जागा लढवल्या होत्या त्यापैकी तीन जागा त्यांनी जिंकल्या तर वायव्य मुंबईची जागा त्यांनी ४८ मतांनी गमावली. यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईत वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. लोकसभा पाठोपाठ उद्धव ठाकरे गटाने मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही विजय मिळवला.


Read More
Kiran Kale's bail application to be heard on August 1
किरण काळे यांच्या जामीन अर्जावर १ ऑगस्टला सुनावणी

सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, काळे यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी आता १ ऑगस्टला ठेवण्यात आली आहे.

Uddhav and Raj Thackeray together! Shinde group ministers say...
उद्धव व राज ठाकरे एकत्र! शिंदे गटाचे मंत्री म्हणतात, ‘आम्हाला मत विभाजनाचा फटका…’

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोघांचा एकत्रित फोटोही समाज…

satis project in thane delayed due to commission politics says rajan vichare
Rajan Vichare : टक्केवारीच्या नादात नवे ठाणे रेल्वे स्थानक, सॅटीस प्रकल्प रखडले, राजन विचारे यांचा आरोप

सोमवारी सॅटिस पूर्व प्रकल्पाचे गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी राजन विचारे यांनी केली.

naresh mhaskes reply to rajan vichares baccha comment
होय, राजन विचारे आजोबा… मी बच्चाच… नरेश म्हस्के यांचे राजन विचारेंना प्रत्युत्तर

तुम्ही लोकसभा हरलातच, विधानसभेतही तुम्हांला गाशा गुंडाळावा लागला आता कदाचित महापालिकेलाही उभे राहाल असे म्हणत विचारेंवर टीका…

राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या खासदारावर केली टीका म्हणाले, बच्चा नया है…

म्हस्के यांना मिळालेल्या या संसद रत्न पुरस्कारा वरुन ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्यावर…

Rajan Vichare criticizes BJP and Shinde group as Thackeray family comes together
ठाकरे एकत्र आल्याने अनेकांच्या पोटात दुखत आहे अशी शिवसेना ठाकरे गटाच्या माजी खासदाराची टीका

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, या निर्णयाने अनेकांच्या पोटात दुखत आहे, अशी टीका शिवसेना (ठाकरे गट)…

ताज्या बातम्या