scorecardresearch

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Videos

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची (Shivsena Udhhav Thackeray) स्थापना २०२३ साली झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचे चिरंजीव तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या गटाचे प्रमुख आहेत. २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली होती. विधान परिषद निवडणुकीची मतमोजनी सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी १६ आमदारांसह सुरत गाठले. शिवसेना पक्षाशी बंडखोरी करत शिंदे यांनी बहुसंख्य शिवसेना आमदारांसह भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. राज्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट उदयास आले.


एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावरदेखील दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.


शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीत सहभागी होत विरोधकाची भूमिका बजावत आहे. असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. तर महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने २१ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ९ जागा त्यांनी जिंकल्या. तर एकनाथ शिंदे यांना १५ जागा मिळाल्या होत्या त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले.


निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ४ जागा लढवल्या होत्या त्यापैकी तीन जागा त्यांनी जिंकल्या तर वायव्य मुंबईची जागा त्यांनी ४८ मतांनी गमावली. यातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईत वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले. लोकसभा पाठोपाठ उद्धव ठाकरे गटाने मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातही विजय मिळवला.


Read More
Uddhav Thackeray gave a advice to CM Devendra Fadnavis
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “ते निती वगैरे सगळ्या गोष्टी मानत असतील तर..”

Uddhav Thackeray: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत विविध प्रश्नांवर…

What was the interaction with Uddhav Thackeray during the photo session at Vidhan Bhavan Neelam Gorhe gave a reaction
Neelam Gorhe: विधानभवनात फोटो सेशनदरम्यान उद्धव ठाकरेंशी काय संवाद झाला? नीलम गोऱ्हे म्हणाल्या…

Neelam Gorhe: पावसाळी अधिवेशना दरम्यान विधानभवनाच्या पाऱ्यांवर आदित्य ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यावर आता नीलम गोऱ्हे…

Uddhav Thackeray gave a response to Eknath Shindes criticism
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Eknath Shinde: मी केवळ अर्ध्या दाढीवरून हात फिरवला तर, आडवे झाले, त्यातून अजून सावरले नाहीत.आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा…

Uddhav Thackeray Interview
‘ठाकरे ब्रँड’ संपवण्याचा प्रयत्न कोण करतंय? उद्धव ठाकरेंची रोखठोक मुलाखत

Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरे म्हणाले, “सदासर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष. हा संघर्ष एका मतलबी वाऱ्यासाठी नाही, तर समाजाच्या…

Sanjay Shirsats viral video Anil Parabs question to the government
Anil Parab on Sanjay Shirsat: संजय शिरसाटांचा तो व्हिडीओ, अनिल परबांचा सरकारला प्रश्न

सरकारने अधिवेशनात नुकतंच जनसुरक्षा विधेयक पारित केलं. मात्र हे विधेयक आणताना राज्यातील मंत्रीच सुरक्षित नाहीत, असा टोला ठाकरे गटाचे आमदार…

avinash jadhav ave a reaction on mira bhynder morcha for marathi bhasha and hindi bhasha controvercy
Avinash Jadhav: “असंच आमच्या विरोधात जात जा…”; अविनाश जाधवांचा पोलिसांना खोचक सल्ला

Avinash Jadhav: मिरा भाईंदरमध्ये आज (८ जुलै ) निघणाऱ्या मराठी भाषिक मोर्चापूर्वीच, मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव…

Devendra Fadnavis criticism uddhav thackeray gave a reaction
Uddhav Thackeray: “भाजपा मेला आहे, या लोकांनी…”; फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर

Uddhav Thackeray: ‘विजयी मेळाव्यात रुदालीचे भाषण झाले’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यांच्या या टीकेला…

BJP MP Nishikant Dubey criticized Raj Thackeray over Marathi bhasha and thackeray brothers Vijayi Melava
“आपल्या घरात कुत्राही वाघ असतो, हिंमत असेल तर…”, भाजपा खासदाराने ठाकरे बंधूंना डिवचलं

BJP MP Reacts On Raj Thackeray Marathi Vijayi Melava: मीरारोड इथे एका व्यापाऱ्याला मराठी न बोलण्यावरून मारहाण झाल्याच्या प्रकरणी मनसेच्या…

sanjay raut gave a response to those who criticizing the Thackeray brothers raj thackeray and uddhav thackeray melava
“मिठाचा खडा टाकण्याचं काम…”; ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर टीका करणाऱ्यांना राऊतांचं प्रत्युत्तर

Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी आज (७ जुलै) पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

ashish shelar criticized Thackeray brothers MNS Gajanan Kale gave a reply to ashish shelar
Ashish Shelar & Gajanan Kale: ठाकरे बंधूंवर भाजपाची टीका, मनसेच्या गजानन काळेंनी दिलं उत्तर

वरळी येथे पार पडलेल्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर भाजपा नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे. त्यावर आता शिवसेना ठाकरे गट आणि…

ताज्या बातम्या