scorecardresearch

शुबमन गिल News

Shubman Gill

शुबमन गिल (Shubman Gill) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ रोजी पंजाबमध्ये झाला. त्याच्या वडिलांना क्रिकेटपटू बनण्याची इच्छा होती. लहानपणी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. प्रशिक्षणासाठी ते मोहाली येथे राहायला गेले. त्यानंतर शुबमनला पंजाबच्या संघाकडून (Punjab Team)खेळायची संधी मिळाली. राज्यस्तरीय अंडर-१६ स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१६-१७ मध्ये त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. पुढच्या वर्षी त्याला रणजी स्पर्धेमध्ये खेळायची संधी मिळाली. या दोन्ही महत्त्वपूर्ण स्पर्धोंमध्ये शुबमनने चांगला खेळ करत अनेक विक्रम केले. पुढे त्याला देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया-सीकडून खेळला.


राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये कौशल्य दाखवल्यानंतर २०१८ मध्ये शुबमन गिल अंडर-१९ विश्वचषकासाठीच्या भारतीय संघामध्ये सामील झाला. त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. झालेल्या एकूण सामन्यांमध्ये त्याने १२४.०० च्या सरासरीने ३७२ धावा केल्या. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये त्याने नाबाद १०२ धावा केल्या. शुबमन अंडर-१९ विश्वचषकामध्ये स्टार प्लेयर म्हणून झळकला. त्याच वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये शुबमन गिल या तरुण खेळाडूवर कोलकाता नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक बोली लावली. २०१८-२०२१ या काळामध्ये तो केकेआरकडून खेळला. पुढे रिटेन न केल्याने २०२२ मध्ये तो गुजरात टायटन्स या संघात सामील झाला. २०२३ च्या आयपीएलच्या १६ व्या हंगामामध्ये त्याने तुफान फलंदाजी करत ऑरेन्ज कॅप मिळवली होती.


२०१९ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताच्या संघात शुबमन गिलचा समावेश करण्यात आला. अशा प्रकारे त्याने एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. पुढे २०२० मध्ये तो पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. तर २०२३ मध्ये त्याला भारतीय संघातून टी-२० सामना खेळायची संधी मिळाली. एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये शुबमन गिलने १८ कसोटी सामन्यांमध्ये ९६६, २७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,४३७ आणि ४५ टी-२० सामन्यांमध्ये २९५ धावा केल्या आहेत. आयपीएल तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये उत्तम खेळ दाखवल्याने भारतीय संघात त्याने जागा पक्की केली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मासह सलामीवीर म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. येत्या आशिया कप २०२३ मध्येही त्याचा समावेश सलामीवीर फलंदाज म्हणून करण्यात आला आहे. आशिया कपसह विश्वचषकामध्ये शुबमन दिलेली जबाबदारी पार पाडेल अशी चाहत्यांना आशा आहे.


क्रिकेटव्यतिरिक्त शुबमन त्याच्या फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. त्याने ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ या चित्रपटातील पवित्र प्रभाकर या पात्राच्या पंजाबी डबिंगसाठी आवाज दिला आहे. अनेक अभिनेत्रीशी त्याचे नाव जोडले जात आहे.


Read More
Shubman Gill Statement on Rohit Sharma and Virat Kohli Will Play 2027 ODI World Cup or Not
“ते दोघेही २०२७…”, शुबमन गिलच्या रोहित-विराटबाबत वक्तव्यातून निवड समितीला स्पष्ट मेसेज; भारताचे दोन्ही दिग्गज वनडे वर्ल्डकप खेळणार?

Rohit Sharma Virat Kohli ODI WC: शुबमन गिलने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या वनडे वर्ल्डकप २०२७ मधील सहभागावर मोठं…

rohit sharma virat kohli marathi news
रोहित, विराटचा अनुभव बहुमूल्य! विश्वचषकासाठी दुर्लक्ष करणार नसल्याचे गिलचे स्पष्टीकरण

विंडीजविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत गिलला या सामन्याइतकेच रोहित आणि विराट यांच्या भवितव्याबाबत प्रश्न विचारण्यात…

india vs west indies
IND vs WI 2nd Test Preview: दुसरा कसोटी सामना केव्हा, कधी, कुठे होणार? प्लेइंग ११ कशी असेल? पाहा संपूर्ण माहिती

India vs West Indies 2nd Test Preview: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये होणारा कसोटी सामना केव्हा, कुठे आणि कधी…

shubman gill
Shubman Gill: “मला आधीच माहीत होतं..”, कर्णधारपद मिळाल्यानंतर गिलची पहिली प्रतिक्रिया, रोहितबाबत बोलताना म्हणाला..

Shubman Gill On Rohit Sharma ODI Captaincy: भारतीय संघाचा नवा वनडे कर्णधार शुबमन गिलने कर्णधारपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलं…

shubman gill
IND vs WI: सातत्याने फ्लॉप ठरत असलेल्या फलंदाजाला गिलचा पाठिंबा, म्हणाला, “तो प्रत्येक सामन्यात..”

Shubman Gill On Sai Sudarshan: भारतीय संघ वेस्टइंडीज विरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्याआधी शुबमन गिलने…

ajit agarkar
भविष्याच्या विचार करून गिलकडे कर्णधारपद दिल्याचे आगरकर यांचे स्पष्टीकरण

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची शनिवारी घोषणा करण्यात आली. पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी अपेक्षित संघनिवड करण्यात आली.

Harbhajan Singh on Rohit Sharma Rohit Sharma ODI captaincy
‘रोहित शर्माला कॅप्टन पदावरून हटवणं धक्कादायक’, हरभजन सिंगनं व्यक्त केली निराशा; म्हणाला, “शुबमन गिल अजून…”

Harbhajan Singh on Rohit Sharma ODI Captaincy: ऑस्ट्रेलिया विरोधात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्माऐवजी शुबमन गिलकडे कर्णधार पद देण्यात…

india tour of australia
IND vs AUS: विराट- रोहितची जोडी ‘या’ दिवशी उतरणार मैदानात! पाहा भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक

India vs Australia Full Timetable; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान जाणून घ्या या दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक.

Why Rohit Sharma Removed as ODI Captain Ahead of IND vs AUS Series
Rohit Sharma: “त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी…” रोहितला वनडेच्या कर्णधापदावरून हटवण्याचा निर्णय का घेतला? आगरकरांचं मोठं वक्तव्य

Why Rohit Sharma Removed as ODI Captain: रोहित शर्माच्या जागी वनडे संघाचं कर्णधारपद आता शुबमन गिलला देण्यात आलं आहे. पण…

ताज्या बातम्या