scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

स्वाभिमानी शेतकरी संघटना News

स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील संघटना आहे. ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी संघटना आहे. राजू शेट्टी यांनी या संघटनेची स्थापना केली होती. ही संघटना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी तसेच इतर प्रश्नांसाठी लढा देते.


राजू शेट्टी हे शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेशी जुळलेले होते, मात्र संघटनेशी काही मतभेदांमुळे त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. यात त्यांनी खासदार निवेदिता माने यांचा परभाव केला होता. शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने भारतीय जनता पक्षासोबत युती केली आणि २०१४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी झाले. त्यांनी २०१४ साली परत हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यात कलाप्पा आवाडे यांचा पराभव करत पुन्हा लोकसभेत निवडून गेले. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला.


Read More
raju shetti urges maharashtra government compensation to farmers after flood heavy rain crop loss
अतिवृष्टीने पिकांचे नुकसान; भरपाई देण्याची कृषिमंत्र्यांकडे ‘स्वाभिमानी’ची मागणी

राज्यामध्ये पुरस्थिती व अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक…

Bhandara Prabhakar Sarve arrested before protest against Nitin Gadkari
नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवण्याची तयारी, मात्र पोलिसांनी…

रस्त्यांच्या गंभीर समस्येकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी मांडवी गावचे सरपंच प्रभाकर सार्वे यांनी नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्या…

raju shetti supports bacchu kadu hunger strike
“… तर शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही”, बच्चू कडूंच्या भेटीनंतर राजू शेट्टी यांनी थेट…

येत्या १४ जूनपर्यंत सरकारने मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय न घेतल्यास राज्यात चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही. कडेकोट बंद पुकारला जाईल, असा…

swabhimani sanghatana aggressive over sugarcane farmers payment issues
प्रलंबित ऊस देयकावरून स्वाभिमानी संघटना आक्रमक; संबंधित कारखान्यांवर कारवाईची मागणी

साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे कारखानदारांनी सर्व हिशोब सादर करून अंतिम देयक शेतकऱ्यांना द्यायचे आहे. हा नियम कोणत्याही साखर कारखान्यांनी…

raju shetti
कोल्हापूर: राजू शेट्टी यांनी चळवळीचा बाजार मांडला, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांची टीका

स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून वैभव कांबळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हेही उपस्थित होते.

Kolhapur, Ravikant Tupkar, Swabhimani Shetkari Sanghathana, Raju Shetti, political conflict, Lok Sabha elections, Sharad Joshi, western Maharashtra, Zilla Parishad, MLA, MP, Vidarbha, Marathwada, state executive meeting, Jalinder Patil,
राजू शेट्टी – रविकांत तुपकर यांच्या वाटा वेगळ्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दीर्घकाळ निभावलेले, फर्डे वक्ते रविकांत तुपकर यांना संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय संघटनेने…

Raju Shetti Ravikant Tupkar Maharashtra results why farm leaders flop
शेतीचे मुद्दे प्रभावी तरीही शेतकरी नेते पराभूत; महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत असं का घडलं?

राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर या दोघांनाही मतदारांवर प्रभाव टाकता आला नाही. राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तर रविकांत…

Vasantrao Naik farmer debt relief movement Kolhapur
‘स्वाभिमानी’च्या वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनास सुरुवात

सरकारने शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करावी ही मागणी घेऊन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली.