scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

तेजश्री प्रधान Videos

अभिनेत्री तेजश्री प्रधानचा (Tejashree Pradhan) जन्म २ जून १९८८ रोजी मुंबईमध्ये झाला. कॉलेजमध्ये असताना तिने अभिनयाचे धडे गिरवले. पुढे ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेद्वारे तिने कलाविश्वामध्ये पदार्पण केले. काही काळ तिने मालिकांमध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या. २०१० मध्ये तिने ‘झेंडा’ चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. २०१३ मध्ये झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेमुळे तेजश्री प्रकाशझोतात आली. तिने साकारलेली ‘जान्हवी’ ही भूमिका खूप गाजली.

२०१४ मध्ये तिने या मालिकेमधील नायकाशी म्हणजेच शशांक केतकरशी लग्न केले. काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एका वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. यादरम्यान तेजश्रीने ‘शर्यत’, ‘लग्न पाहावे करुन’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ असे चित्रपट केले. तिचा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट विशेष लोकप्रिय झाला. २०१९ या वर्षामध्ये तिची ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका सुरु झाली. तेजश्री प्रधानने ‘बबलू बॅलचर’ या हिंदी चित्रपटामध्ये शर्मन जोशीसह काम केले आहे.
Read More

ताज्या बातम्या