scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

विश्वास नांगरे पाटील Photos

विश्वास नांगरे पाटील (Vishwas Patil) आयपीएस अधिकारी आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या व्याख्यानांमुळे ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. ते सध्या मुंबईचे पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आहेत.

२००८ च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म १ जून १९७३ रोजी सांगली जिल्ह्यातील कोकरूड (शिराळा) येथे झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण शिराळा तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले आणि बी. ए.चं शिक्षण कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून घेतलं. त्यांनी इतिहास विषयात सुवर्ण पदक पटकावून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि मग प्रशासकीय सेवेच्या तयारीला लागले. आतापर्यंत त्यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुंबई पोलीसदल उपायुक्त, ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुंबई दक्षिण विभाग अप्पर पोलीस आयुक्त, नाशिक पोलीस आयुक्त म्हणून काम केलं आहे.Read More