कार्यालयीन जागा क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : कार्यालयीन जागा खरेदी-विक्री व्यवहारातील देशातील सर्वात मोठा व्यवहार अमेरिकेच्या ब्लॅकस्टोन कंपनीने मुंबईत नोंदविला आहे. खासगी निधी उभारणी क्षेत्रातील या कंपनीने मध्य उपनगरातील ‘वन बीकेसी’तील ७ लाख चौरस फूट जागा २,५०० कोटी रुपये मोजून खरेदी केली आहे.

मुंबईस्थित रेडिअस या विकासक कंपनीची ‘वन बीकेसी’ ही शहरातील महत्त्वाचे कार्यालयीन जागा असलेली मालमत्ता म्हणून ओळखली जाते. या इमारतीतील निम्मी जागा आता ब्लॅकस्टोनकडे आली आहे. २.५ एकर जागेत १५ लाख चौरस फूट क्षेत्रफळात ‘वन बीकेसी’त आहे.

ब्लॅकस्टोनने २००५ मध्ये भारतातील स्थावर मालमत्ता क्षेत्रातील १०.४ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे लक्ष्य जाहीर केले होते. पैकी ५.४ अब्ज डॉलरचा टप्पा देशातील विविध ३३ प्रकल्प-गुंतवणुकीतून पार केला आहे. त्यापैकी ‘वन बीकेसी’चा व्यवहार महत्त्वाचा मानला जात आहे.

अमेरिकी कंपनीने एप्रिल २०१९ मध्ये एस्सेल प्रॉपॅकमधील मोठा हिस्सा ३,२११ कोटी रुपयांना खरेदी केला. तर नुकताच वाधवान ग्लोबल कॅपिटल व डीएचएफएलचा ९७.७ टक्के हिस्सा आधार हाऊसिंग फायनान्समधून ३,००० कोटी रुपयांना घेतला.

ब्लॅकस्टोनची भारतातील स्थावर मालमत्ता क्षेत्रात आघाडीच्या इंडियाबुल्स रिअल इस्टेट, पंचशील रिएल्टी, के. रहेजा कॉर्प आदींसह भागीदारी आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blackstone group buys one bkc building in mumbai