देशातील सेवा क्षेत्राची वाढ गेल्या महिन्यात ५२.६ टक्क्य़ांवर गेली असून गेल्या पाच महिन्यातील ती सवरेत्कृष्ट राहिली आहे. ‘एचएसबीसी इंडिया’ने केलेल्या या सर्वेक्षणात नव्या व्यवसाय मागणीमुळे सेवा क्षेत्र उंचावल्याचे नमूद करण्यात आले आहे.
देशातील सेवा कंपन्यांचा नोव्हेंबरमधील प्रगतीचा आढावा घेताना वित्तसंस्थेने या क्षेत्राची वाढ ऑक्टोबरमधील ५० टक्क्य़ांवरून ५२.६ टक्क्य़ांवर गेल्याचे नमूद केले आहे. जूननंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. ५० टक्क्य़ांहून अधिक वाढ म्हणजे सेवा क्षेत्र विस्तारत असल्याचे वित्तसंस्थेचे परिमाण आहे.
२००७ च्या मध्यानंतर देशातील व्यवसाय वातावरण प्रथमच उंचावल्याचे निरीक्षण यानिमित्ताने ‘एचएसबीसी इंडिया’च्या प्रमुख अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी नोंदविले आहे. शाश्वत वाढीसाठी गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब असलेल्या धोरणांवर सरकार पातळीवरून निर्णय घेत असल्याचेही भंडारी म्हणाले.
‘एचएसबीसी’नुसार सेवा क्षेत्रातील नोव्हेंबरमधील रोजगारावर मात्र विपरीत परिणाम झाला आहे. गेल्या महिन्यात कार्यरत मनुष्यबळाच्या संख्येत काहीशी घसरण नोंदली गेली आहे. गेल्या चार महिन्यात प्रथमच याबाबत घट झाली आहे.
निर्मिती क्षेत्राचे मोजमाप करणारा ‘एचएसबीसी’चा ऑक्टोबरमधील निर्देशांकदेखील ५३.६ टक्के असा पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India fastest growing services sector